रांची- झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच त्यांनी ट्वीट करून यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. चंपाई सोरेने हे झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष सोडतील हे स्पष्ट झालंय. त्यांनी आता आपल्या समोर तीन पर्याय असल्याचं म्हटलं आहे.
चंपाई सोरेन म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून मला प्रचंड अपमान सहन करावा लागत आहे. आज माझ्या जीवनाचा नवा अध्याय सुरु होत आहे. यात माझ्याकडे तीन पर्याय आहेत. एक, राजकीय संन्यास घेणे. दुसरा, आपल्या स्वत:चे संघटन सुरु करणे आणि तिसरा, कोणी साथ देणारा मिळाला तर त्याच्या सोबत पुढे जाणे. माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत'