Jio इन्स्टिट्यूटबाबत नीता अंबानींची मोठी घोषणा

nita ambani
nita ambani
Updated on
Summary

जीओ इन्स्टिट्यूटची (Jio Institute) शैक्षणिक सत्रे यावर्षीपासून सुरु होणार आहेत. रिलायन्स फाऊंडेशनच्या (Reliance Foundation) संस्थापक आणि प्रमुख नीता अंबानी (Nita Ambani) यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

नवी दिल्ली- जीओ इन्स्टिट्यूटची (Jio Institute) शैक्षणिक सत्रे यावर्षीपासून सुरु होणार आहेत. रिलायन्स फाऊंडेशनच्या (Reliance Foundation) संस्थापक आणि प्रमुख नीता अंबानी (Nita Ambani) यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची 44 वार्षिक सर्वसाधारण सभा (Reliance Industries Ltd's (RIL) 44th Annual General Meeting) गुरुवारी पार पडली. यावेळी नीता अंबानी बोलत होत्या. नवी मुंबईतील कॅम्पसमधून जीओ इन्स्टिट्यूटची शैक्षणिक प्रक्रिया यावर्षीपासून सुरु होईल, असं त्या म्हणाल्या. (Jio Institute to start academic sessions this year said Nita Ambani)

जीओ इन्स्टिट्यूट शैक्षणिक संस्थांसमोर एक आदर्श उदाहरण म्हणून समोर येईल, असंही नीता अंबानी म्हणाल्या. रिलायन्स फाऊंडेशनच्या जिओ इन्स्टिट्यूटला २०१८ मध्ये प्रतिष्ठित शिक्षण संस्थेचा Institute of Eminence (IoE)दर्जा मिळाला आहे. जीओ इन्स्टिट्यूटचे कॅम्पस ५२ एकर जमिनीवर पसरलेले आहे आणि याचे क्षेत्रफळ ३,६०,००० स्क्वेअर फूट आहे. हे अती भव्य कॅम्पस महाराष्ट्राच्या नवी मुंबईतील उलवे येथे स्थित आहे.

nita ambani
कोवॅक्सिन दोन वर्षांच्या मुलांवर काम करणार का?

भारतातील उच्चशिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘प्रतिष्ठित शिक्षण संस्थां’च्या उपक्रमात २० संस्थांचा समावेश करण्यात आलाय. यानुसार या शैक्षणिक संस्थांना पाच वर्षांत केंद्राकडून एक हजार कोटींचा निधी मिळत आहे. यातील खासगी संस्थांपैकी प्रतिष्ठित संस्थांमध्ये रिलायन्स उद्योग-समूहाच्या जिओ इन्स्टिट्यूटचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे या संस्थेचे कामकाज सुरू झाले नसताना याला ‘प्रतिष्ठित शिक्षण संस्थां’ ठरवण्यात आले होते. त्यामुळे सरकारवर मोठी टीकाही करण्यात आली होती.

nita ambani
रिलायन्सने वर्षभरात 75 हजार नोकऱ्या दिल्या - मुकेश अंबानी

दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी कंपनीच्या भागधारकांशी संवाद साधला. आम्ही देशाची काळजी करतो, कर्मचाऱ्यांची आम्हाला चिंता आहे. कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी, भागधारकांनी कोरोनाचा सामना केला. कोरोनामुळे कुटुंबातील सदस्यांना गमावलं. अशा कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कोरोना असुनही आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये RIL ची कामगिरी चांगली राहिली, असं अंबानी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.