मुकेश अंबानींची मोठी घोषणा; दिवाळीत होणार जिओ '5G' चा धमाका

Jio चे ग्राहक दरमहा सरासरी 20 GB डेटा वापरत आहेत
मुकेश अंबानींची मोठी घोषणा; दिवाळीत होणार जिओ '5G' चा धमाका
Updated on

रिलायन्स जिओ 5जी इंटरनेट सेवा दिवाळीपासून सुरू होणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी नुकतीच केली आहे. पहिल्या टप्प्यातील जिओ 5 G इंटरनेट सेवा ही देशातील फक्त चार मुख्य शहरात सुरू होणार असून पुढील वर्षापर्यंत संपूर्ण देशभरात इंटरनेट सेवा देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 5 G मुळे देशात मोठा बदल होणार असून डिजिटलायझेशनला मोठा हातभार लागणार असल्याचंही मुकेश अंबानी यांनी सांगितल आहे.

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी कंपनीच्या या 45 व्या एजीएमला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएमवर आरआयएलच्या गुंतवणूकदारांसोबतच कॉर्पोरेट जगताच्याही नजरा खिळल्या आहेत. ते पुढे आणखी काय घोषणा करतील याकडे सर्वांच लक्ष्य लागून राहिलं आहे.

रिलायन्स jio 5 G ची इंटरनेट सेवा आता फक्त दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या मेट्रो शहरात दिवाळीपर्यंत सुरू होणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी यावेळी केली. डिसेंबर 2023 पर्यंत देशातील प्रत्येक शहरात 5 जी इंटरनेट सेवा देणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे. तसेच रिलायन्स आपल्या जिओ 5 जी सेवेसाठी अद्यावत तंत्रज्ञान वापर असल्याचेही मुकेश अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स जिओ 5 जी नेटवर्ककरीता दोन लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.

जिओकडून एअरफायबरची घोषणा

त्याचबरोबर जिओकडून एअरफायबरची घोषणा करण्यात आली आहे. जिओ एअरफायबरमध्ये ब्रॉडबॅण्ड इंटरनेटचा स्पीड अधिक असणार आहे. फिक्स्ड ब्रॉडबॅण्डमध्ये भारत येत्या काळात पहिल्या 10 देशांमध्ये असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.