Wine Sales: किराणा दुकानात मिळणार बिअर, जाणून घ्या अटी व नियम

Sale Of Beer At Departmental Stores
Sale Of Beer At Departmental Storesesakal
Updated on

काही दिवसांपूर्वी, उत्पादन शुल्कमंत्री आणि शिंदे गटाचे शंभुराजे देसाई यांनी राज्यातील मॉलमध्ये वाइनविक्री सुरूवात होणार असे संकेत दिले होते. मात्र, भाजपने त्यांला विरोध दर्शवला. दरम्यान, देशातील एका राज्यात किराणा दुकानात बिअर विक्रिला परवानगी देण्यात आली आहे. (J&K Govt Okays Sale Of Beer At Departmental Stores)

जम्मू-कश्मीरमध्ये अधिकृत किराणा दुकानांमध्ये बिअर उपलब्ध होणार आहे. कश्मीरच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी सोमवारी याबाबतच्या अर्जाला मान्यता दिली आहे. आता जम्मू-कश्मीरच्या शहरी भागातील अधिकृत डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये बिअर आणि इतर रेडी टू ड्रिंक प्रकारातील शितपेये उपलब्ध होणार आहेत. मात्र, अशा प्रकारच्या स्टोअर्ससाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

काय आहेत अटी?

जम्मू आणि श्रीनगरसाठी एखाद्या व्यावसायिक संकुलातील 1200 चौरस फूट जागेचा गाळा, वार्षिक पाच कोटी उत्पन्न अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत. तर इतर शहरी भागासाठी 2 कोटी इतकी अट ठेवण्यात आली आहे.

आता जम्मू-कश्मीरच्या शहरी भागातील अधिकृत डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये बिअर आणि इतर रेडी टू ड्रिंक प्रकारातील शितपेये उपलब्ध होणार आहेत. मात्र, अशा प्रकारच्या स्टोअर्ससाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. जम्मू आणि श्रीनगरसाठी एखाद्या व्यावसायिक संकुलातील 1200 चौरस फूट जागेचा गाळा, वार्षिक पाच कोटी उत्पन्न अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत. तर इतर शहरी भागासाठी 2 कोटी इतकी अट ठेवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.