श्रीनगर - पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या युवा शाखेचा अध्यक्षश वहीद उर रेहमान परा हा दहशतवादी संघटनेचा एक भाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्याच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी म्हटलं की, विद्यार्थीदशेत असल्यापासून पत्रकारिता आणि राजकारण असा त्याचा 13 वर्षाचा प्रवास हा संधीसाधूपणा, दुटप्पीपणा, छळ, कारस्थाने यांनी भरलेला आहे. राजकीय फायद्यासाठी पराने पाकिस्तानी दहशतवाद्यांना शस्त्रे मिळवून देण्यासाठी तसंच इतर प्रकारची मदत केली असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स काश्मिर विंगने म्हटलं की, गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयात पराविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या निकटवर्तींयांपैकी एक अशीही पराची ओळख आहे. त्याच्याविरोधातील आरोपपत्रात म्हटलं आहेक ,ी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना त्यांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी पराने मदत केली. त्याचा वापर राजकीय विरोधकांचा बंदोबस्त करण्यासाठी पराने केला. यासाठी सीआयकेनं पाच साक्षीदार आणि टेक्निकल इंटेलिजन्सच्या मदतीने 19 पानी आरोपपत्र तयार केलं आहे. तसंच 100 हून जास्त पानं जोडली असून त्यामध्ये आरोप सिद्ध करण्यासाठी काही तथ्ये मांडली आहेत. यामध्ये अशा काही घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यामध्ये पक्षातील राजकीय विरोधकांना हटवण्यासाठी दहशतवाद्यांचा वापर केला.
वहीद पराचे पाकिस्तानी दहशतवादी अबु दुजाना आणि अबु कासिम यांच्याशी संबंध होते असाही आरोप पोलिसांनी केला आहे. तो दोघांनाही भेटत होता आणि अनेकदा इतर हस्तकांच्या माध्यमातून तो संपर्कात असायचा. दोघांनाही याआधी सुरक्षा दलाने कंठस्नान घातलं आहे.
पाकिस्तानाचा दहशतवादी अबु दुजाना याचं एका स्थानिक मुलीशी लग्न लावून देण्यातही पराची भूमिका होती अशी माहिती समोर आली होती. पोलिसांनी 2007 ते 2020 पर्यंत त्याला पकडण्यापर्यंतच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते. 2013 मध्ये पराने पीडीपीमध्ये प्रवेश केला. त्याने पक्षातही स्वत:चं सुरक्षित असं स्थान निर्माण केलं. पाकिस्तानकडून पराला काश्मीर मुद्द्यावर कोणतंही असं काम करण्याची सूट होती ज्याचा पुढच्या काळात फायदा होईल. त्यानं हे काम चोखपणे पार पाडल्याचं ही यामध्ये म्हटलं आहे.
सीआयकेने पराविरोधात युपीए आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी केली आहे. तसंच पराविरोधात कारवाईसाठी जम्मू काश्मीरच्या गृहखात्याकडूनही परवानगी घेतली आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी बेकायदेशीर आणि देशविरोधी कारवाया करणाऱ्या अनेकांविरोधात सीआय़केनं गुन्हा दाखल केला होता.
एनआय़एने पराचे हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबाशी संबंध असल्याचं म्हटलं आहे. जानेवारीमध्ये पराला जामिनावर सोडण्यात आलं होतं. सीआयकेने त्याच दिवशी पराला अटक केली होती. तेव्हापासून परा तुरुंगात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.