नवी दिल्ली : प्रसिद्ध उर्दू कवी आणि अनेक सुमधूर चित्रपट गीतांची रचना करणारे गीतकार गुलजार आणि संस्कृत पंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ निवड समितीने शनिवारी ही घोषणा केली.
गुलजार हे सध्याच्या काळातील अत्यंत प्रतिभावान उर्दू कवींपैकी एक आहेत. हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी रचलेली अनेक गीते अजरामर झाली आहेत. गझल लेखन क्षेत्रातही त्यांनी महत्वाचे योगदान दिलेले आहे. त्यांना यापूर्वी साहित्य अकादमी (२००२), दादासाहेब फाळके पुरस्कार (२०१३), पद्मभूषण (२००४) असे सन्मान प्राप्त झाले आहेत.
याशिवाय त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळालेले आहेत. गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा असे आहे. ऑगस्ट १९३६ साली त्यांचा जन्म आता पाकिस्तानमध्ये असलेल्या दीना शहरात झाला होता. फाळणीनंतर गुलजार यांचे कुटुंबिय अमृतसरला आले होते. तेथून गुलजार यांनी मुंबई गाठली होती.
रामभद्राचार्य नेमके आहेत तरी कोण?
रामभद्राचार्य चित्रकूट येथील तुलसी पीठाचे संस्थापक आणि प्रमुख आहेत. ते एक नामांकित हिंदू आध्यात्मिक नेते, शिक्षक आणि शंभराहून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. जन्मानंतर दोन महिन्यांनीच दृष्टी गमावणारे रामभद्राचार्य हे सर्वोत्तम शिक्षक असण्याबरोबरच संस्कृत भाषेचे विद्वानही आहेत.
त्यांना २२ भाषेचे ज्ञान आहे. रामभद्राचार्य यांना भारत सरकारकडून २०१५ मध्ये पद्मविभूषण सन्मानाने गौरविण्यात आले आहे. रामभद्र यांनी श्रीभार्गवराघवीयम, अष्टावक्र, आझादचंद्रोखरचरितम, लघुरघुवरम, सरयूलहरी, भृंगदूतम, कुब्जापत्रम याचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात शंडीखुर्द येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारी १९५० रोजी रामभद्राचार्य यांचा एका ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. जन्मानंतर त्यांच्या दानेही डोळ्याला संसर्ग झाला. मात्र गावात उपचाराची सुविधा नव्हती आणि स्थानिक पातळीवर औषधोपचार करण्यात आले.
मात्र दृष्टी कमी झाली. तेव्हा ते दैवी दृष्टीद्वारे जग पाहू लागले. त्यांना कधीही कोणत्याही प्रकारचे वाचन करावे लागले नाही किंवा लिखाण करावे लागले नाही. तसेच ब्रेल लिपीचाही वापर करावा लागला नाही. केवळ श्रवणाच्या बळावर त्यांनी शास्त्रावर प्रभुत्व मिळवले. सुंदर कविता रचणे ही ईश्वराचीच कृपा असल्याचे ते म्हणतात. गिरिधर असे त्यांचे नाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण आजोबा पंडित सूर्यबली मिश्रा यांच्या घरी झाले वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी संस्कृतमधील संपूर्ण भगवतगीता अध्याय आणि श्लोक क्रमांकांचे पाठांतर केले. आजोबांच्याा मदतीने वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी संत तुलसीदासाचे संपूर्ण रामचरितमानस पूर्ण केले. वेद, उपनिषद, भागवतपुराण, संस्कृत व्याकरण आदींत प्रभुत्व मिळवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.