Crime News: 'भेटायला ये नाहीतर तुला नापास करेन...', धमकी देत JNUच्या प्राध्यापकाने विद्यार्थिनीला पाठवले अश्लील मेसेज अन्...

Crime News: जेएनयूच्या एका प्राध्यापकावर २० वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रोफेसरने तिचा इतका छळ केला की तिला कॅम्पस सोडून जावे लागले. विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
Crime News
Crime NewsEsakal
Updated on

दिल्लीतील जेएनयूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जेएनयूमधील एका प्राध्यापकावर एका विद्यार्थिनीने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. प्राध्यापकाने तिला त्रास दिल्यानं तिला कॅम्पस सोडण्यास भाग पाडले गेले. विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, प्राध्यापक तिला चिनी भाषेमध्ये अश्लील मेसेज पाठवत असे आणि तिला त्यांच्या चेंबरमध्ये एकटीला भेटण्यासाठी बोलावत असे. 20 वर्षीय विद्यार्थी जेएनयूच्या चायनीज आणि साउथ ईस्ट एशियन स्टडीज सेंटरमध्ये शिकत होती. आठवडाभरापूर्वी दिल्ली पोलिसांनी या प्राध्यापकावर कारवाई सुरू केली आहे.

आरोपी प्राध्यापकांना निश्चित तारखेला तपास अधिकारी किंवा न्यायालयासमोर हजर होण्यास सांगण्यात आले आहे. प्राध्यापक तिच्या वर्गमित्रांना तिचा पत्ता विचारायचा असा आरोपही विद्यार्थिनीने केला आहे. याशिवाय तिला कॅम्पस सोडण्यास जबरदस्ती करण्यात आली, असाही आरोप विद्यार्थिनीचा आहे.

Crime News
PM Modi : मोदींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव; पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली द्विपक्षीय संबंध बळकट करण्याची अपेक्षा

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'पीडितेने वसंत कुंज (उत्तर) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. प्राध्यापकाने विद्यार्थ्यींनीला पाठवलेल्या चीनी भाषेतील व्हॉट्सॲप मेसेजची कागदोपत्री पुराव्यांचे विश्लेषण करण्यात आले आणि कलम 164 सीआरपीसी अंतर्गत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आला. निवेदनाव्यतिरिक्त तिच्या वर्गातील इतर विद्यार्थ्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. पुरेशा पुराव्याच्या आधारे आम्ही आता प्राध्यापकाला ताब्यात घेतले असून नंतर आरोपपत्र दाखल केले जाईल असंही पुढे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Crime News
PM Modi : मोदींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव; पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली द्विपक्षीय संबंध बळकट करण्याची अपेक्षा

महिलेने 30 एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, प्राध्यापकाने तिला 'सतत मेसेज आणि कॉल'द्वारे त्रास दिल्याचा आरोप आहे. तो तिला अश्लील कविता पाठवायचा आणि तिला एकटीने येऊन भेटण्यासाठी धमकी देत असे. विद्यार्थिनीने आरोप केला की, जेव्हा तिने प्राध्यापकाने भेटण्यासाठी नाकार दिला तेव्हा त्याने तिला पेपरमध्ये नापास करण्याची धमकी दिली. पोलिसांनी सांगितले की, प्राध्यापकाने तिचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी तिच्या वर्गमित्रांनाही त्रास दिला.

Crime News
INDIA vs NDA: मोदींना सत्तेतून खेचणार? ही तर लोकांची ईच्छा, योग्य वेळी पाऊले उचलणार; सत्तास्थापनेबाबत खर्गे स्पष्टच बोलले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.