AI मुळे लोकांच्या नोकऱ्या जाणार? केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान

AI Stealing Tech Jobs
AI Stealing Tech JobsEsakal
Updated on

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. विशेषत: चॅटजीपीटी लोकप्रिय झाल्यापासून सामान्य लोकही याबद्दल चर्चा करत आहेत. याबाबत अनेक अहवाल देखील प्रसिद्ध झाले आहेत. याचा मानवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तर याचा सर्वात मोठा धोका नोकऱ्यांना झाला आहे.

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत माहिती दिली आहे. सरकार AI चे नियमन करेल जेणेकरून डिजिटल नागरिकांचे कोणतेही नुकसान होणार नाही. एआय चा वापर चांगल्यासाठी केला जाईल आणि लोकांना नुकसान करण्यासाठी नाही.

AI Stealing Tech Jobs
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

लोकांच्या नोकऱ्या जाणार का?

राजीव चंद्रशेखर म्हणाले, एआयने गेल्या काही वर्षांत एक कोटीहून अधिक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. अशी शक्यता आहे की एआय एखाद्या दिवशी इतके बुद्धिमान होईल की ते मानवांची जागा घेईल. पण सध्या एआयचा वापर फक्त मर्यादित कामांपुरता आहे. त्यामुळे कार्यक्षमता निर्माण होते. मात्र येत्या काही दिवसांत ते रूटीन  नोकऱ्यांची जागा घेऊ शकते, अशी शक्यता आहे.

मात्र सध्या एआयमुळे लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या, असे काहीही नाही. आताच्या  AI टास्कनुसार विकसित केले गेले आहे आणि  ते बुद्धीमत्ता व तर्कांचा वापर करत नाही. बर्‍याच नोकऱ्यांना बुद्धीमत्ता आणि तर्काची आवश्यकता असते, जे सध्या कोणतेही AI करू शकत नाही, असे राजीव चंद्रशेखर म्हणाले.

AI Stealing Tech Jobs
Parachute Coconut Oil Success Story : पॅराशूट खोबरेल तेलाचा सर्वात मोठा ब्रँड बनाण्यामागची गोष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.