जोधपूर हिंसाचार: भाजप अध्यक्ष सतीश पुनियांचं राज्यपालांना पत्र

जोधपूरमध्ये हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
जोधपूर हिंसाचार: भाजप अध्यक्ष सतीश पुनियांचं राज्यपालांना पत्र
Updated on
Summary

जोधपूरमध्ये हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

जोधपूर येथे झालेल्या जातीय हिंसाचारानंतर संपूर्ण राजस्थान शहर हादरले आहे. विविध पातळीवर या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, जोधपूरमध्ये हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता याप्रकरणी राजस्थानचे भाजप अध्यक्ष सतीश पुनिया (Satish Poonia) यांनी हिंसाचाराच्या मुद्यावरुन राज्यपाल कलराज मिश्रा (Kalraj Mishra) यांना पत्र लिहले आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. यासोबतच राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सूचना देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. (rajasthan satish puniya write to letter governor kalraj mishra)

जोधपूर हिंसाचार प्रकरणात आत्तापर्यंत 97 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सतीश पुनिया यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांना लिहिलेल्या पत्रात जोधपूरमधील हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी करण्याची तुम्हाला नम्र विनंती करतो असे म्हटले आहे. राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी आणि राजस्थानमध्ये जातीय घटना घडू नयेत यासाठी राज्य सरकारला आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात. तसेच या घटनेत सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

जोधपूर हिंसाचार: भाजप अध्यक्ष सतीश पुनियांचं राज्यपालांना पत्र
ट्विटर वापरण्यासाठी लागणार पैसे, इलॉन मस्क यांची मोठी घोषणा

पुनिया यांनी पत्रात काँग्रेस सरकार राजस्थानमध्ये चुकीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था हे मोठे आव्हान आहे. काँग्रेसच्या राजकारणामुळेच राज्यातील परिस्थिती बिकट झाली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या खुर्चीची चिंता करण्यापेक्षा राज्यातील जनतेची चिंता करावी, असेही त्यांनी पत्रात म्हटंले आहे.

दरम्यान, या हिंसाचारानंतर भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली असून आरोपप्रत्यारोप सुरु झाले आहेत. एका बाजूला भाजपने या हल्ल्यालाठी कॉंग्रेसला कारणीभूत ठरवले आहेत. तर दुसरीकडे या हिंसाचारासाठी कॉंग्रेस भाजपला जबाबदार धरत आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता आणि त्यामागे भाजप आणि आरएसएसचा हात असल्याचे राज्य सरकारचे मंत्री प्रताप सिंह यांनी म्हटले आहे. राजस्थानमध्ये मंदिर आणि मशिदीमध्ये कोणताही वाद नाही. येथे लाऊडस्पीकर आणि बुलडोझरचा वाद नाही. धर्माचा विचार न करता गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असेही मंत्री प्रताप सिंह म्हणाले.

जोधपूर हिंसाचार: भाजप अध्यक्ष सतीश पुनियांचं राज्यपालांना पत्र
सेंट्रल व हार्बर लाईनची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.