Journalist Shot Dead: पहाटे ४ वाजता दरवाजा वाजवला अन्...; पत्रकाराची गोळ्या घालून हत्या

या पत्रकाराच्या सरपंच भावाला देखील गोळ्या घालून मारण्यात आलं होतं.
Journalist shot dead in Bihar friday early morning 4 am at his home
Journalist shot dead in Bihar friday early morning 4 am at his home
Updated on

अरारिया : एका दैनिकाच्या पत्रकारावर पहाटे ४ वाजता घराचा दरवाजा वाजवून बाहेर बोलावून बेछूट गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी पहाटे बिहारमधील अरारिया इथं ही घटना घडली आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Journalist shot dead in Bihar friday early morning 4 am at his home)

Journalist shot dead in Bihar friday early morning 4 am at his home
Luna 25 : अखेर चंद्राची लपलेली बाजू आली समोर; रशियाच्या 'लूना 25'ने पाठवला पहिला फोटो

विमल कुमार यादव असं गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या पत्रकाराचं नाव आहे. अरारिया इथल्या राणीगंज बाझार इथल्या राहत्या घरी हा प्रकार घडला आहे. दोन वर्षांपूर्वी या पत्रकाराच्या सरपंच असलेल्या भावाची देखील अशाच प्रकारे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

Journalist shot dead in Bihar friday early morning 4 am at his home
Khalnayak 2 : प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई कमबॅकच्या तयारीत, 'खलनायक २' लवकरच येणार?

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी विमल कुमार यादव यांच्या घराच्या दारावर टकटक करत त्यांना झोपेतून उठवलं. विमल कुमार यादव यांनी दार उघडताच त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. विमलकुमार यांच्या भावाची हत्या देखील गोळ्या घालून करण्यात आली होती. (Latest Marathi News)

या हत्या प्रकरणातील विमलकुमार हे प्रमुख साक्षीदार होते. या प्रकरणाची कोर्टात ट्रायल सुरु होती. विमल कुमार हे आपल्या पत्नी, मुलगा आणि मुलीसह राहत होते. या घटनेमुळं देशभरात खळबळ उडाली आहे. (Marathi Tajya Batmya)

Journalist shot dead in Bihar friday early morning 4 am at his home
मुंबई विद्यापीठ निवडणूक का महत्वाची? राजपुत्र विरुद्ध उद्धवपुत्र पहिल्यांदाच थेट मैदानात! मात्र सरकारने सामनाच रद्द केला

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली असून घटनास्थळी श्वान पथकांना देखील पाचारण करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अशोक कुमार सिंह यांनी पत्रकारांना दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()