15 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा... पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या हत्येप्रकरणी 5 जण दोषी; दिल्ली न्यायालयाचा निर्णय

Journalist Soumya Vishwanathan Murder Case
Journalist Soumya Vishwanathan Murder Case
Updated on

Journalist Soumya Vishwanathan Murder Case: पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्येनंतर 15 वर्षांहून अधिक काळानंतर दिल्ली न्यायालयाने बुधवारी 2008 च्या सौम्या विश्वनाथन प्रकरणात 5 जणांना खून, दरोडा आणि मकोका अंतर्गत गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले.

30 सप्टेंबर 2008 रोजी सकाळी 3.30 वाजता कामावरून घरी परतत असताना सौम्या विश्वनाथन यांची कारमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येमागे दरोडा असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

याप्रकरणी आज (बुधवार) न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार पांडे यांनी सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे.

रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार यांना हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. तर अजय सेठी यांना MCOCA 1999 च्या कलमांतर्गत मालमत्तेची चोरी केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. न्यायालय पुढील आठवड्यात शिक्षेचे प्रमाण जाहीर करेल. (Latest Marathi News)

रवी कपूर, अमित शुक्ला, अजय कुमार आणि बलजीत मलिक यांनी लुटण्याच्या उद्देशाने सौम्याची हत्या केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

Journalist Soumya Vishwanathan Murder Case
India vs Pakistan : दुसऱ्यांमध्ये दोष शोधणे बंद करा... पीसीबीने आयसीसीकडे तक्रार करताच माजी खेळाडू भडला

दरम्यान, अजय सेठीने गुन्ह्यात वापरलेलं वाहन स्वतःकडे ठेवले होते. न्यायालयाने त्याला IPC च्या कलम 311 आणि MCOCA च्या कलम 3(2) आणि 3(5) अंतर्गत दोषी ठरवले आहे. (Latest Crime News)

30 सप्टेंबर 2008 रोजी राजधानी दिल्लीत विश्वनाथन यांची हत्या करण्यात आली होती. एका टीव्ही चॅनलमध्ये काम करणारा विश्वनाथन पहाटे साडेतीन वाजता ऑफिसमधून घरी परतत होत्या. तपासाअंती पोलिसांनी हत्येमागे दरोड्याचा हेतू असल्याचे स्पष्ट केले. हत्येप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती. हे सर्वजण मार्च 2009 पासून तुरुंगात आहेत.

Journalist Soumya Vishwanathan Murder Case
Raj Thackeray: करोडो रुपयांचा फ्लायओव्हर पडतो, मंत्र्याचा राजीनामा नाही तरी लोक मतदान करतात; राज ठाकरे संतापले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.