PM मोदी पुलावर अडकल्यानंतर भाजपची आगपाखड; CM चन्नी म्हणतात..

पंजाबच्या सरकारने दाखवून दिले आहे की, ते विकासविरोधी आहेत आणि त्यांना स्वातंत्र्य सैनिकांबद्दलही आदर नाही.
Modi
Modi ANI
Updated on

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा ताफा आंदोलकामुळे जवळपास 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून पडल्यानंतर या प्रकरणावर पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी (CM Channi) यांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे. चन्नी म्हणाले की, “ पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही चूक नव्हती. पंतप्रधान ज्या मार्गावरुन जाणार होते त्याबाबतच्या आराखड्याची योजना शेवटच्या क्षणी बनवण्यात आली. त्यांना हेलिकॉप्टरने जायचे होते. त्यांच्या रॅलीच्या सुरक्षा व्यवस्थेवर मी रात्री उशिरापर्यंत काम करत होतो. रॅलीसाठी 70,000 खुर्च्या लावण्यात आल्या होत्या पण फक्त 700 लोक आले होते. (Panjab CM Charanjit Singh Channi)

Modi
मी जिवंत परतू शकलो; मुख्यमंत्र्यांना आभारी आहे म्हणून सांगा; PM मोदींचा खोचक टोला

दरम्यान, पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नड्डा यांनी दावा केला आहे की, जेव्हा पीएम मोदींचा ताफा अडकला होता तेव्हा सीएम चन्नी यांनी फोनवर बोलून प्रश्न सोडवण्यास नकार दिला. (PM Modi Security Issue In Pnajab )

Modi
'दोन वर्षे खूप असतात, लॉकडाऊनसाठी नागरिक आता तयार होणार नाहीत'

नड्डा पुढे म्हणाले की, पंजाबच्या सरकारने त्यांच्या घृणास्पद कारवाया करून दाखवून दिले आहे की, ते विकासविरोधी आहेत आणि त्यांना स्वातंत्र्य सैनिकांबद्दलही आदर नाही. दरम्यान, सर्वात चिंतेची बाब म्हणजे ही घटना पीएम मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सीएम चन्नी यांनी फोनवर बोलून प्रकरण सोडवण्यास नकार दिला. पंजाबच्या काँग्रेस सरकारने वापरलेली ही रणनीती लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला खटकेल असे नड्डा यांनी म्हटले आहे. नड्डा म्हणाले, लोकांना रॅलीत येण्यापासून रोखण्याच्या सूचना राज्य पोलिसांना देण्यात आल्या होत्या. पोलिसांचा मनमानी आणि आंदोलकांच्या मिलीभगतमुळे रॅलीला येणाऱ्या मोठ्या संख्येने बसेसही अडकून पडल्याचा आरोप नड्डा यांनी पोलिसांवर केला आहे. (BJP JP Nadda Reaction After Security Issue In PM Modi Panjab Visit)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.