JP Nadda : काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, कमिशन; जे. पी नड्डा यांचे टीकास्त्र

नड्डा यांचे टीकास्त्र; मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासाठी रोड शो
jp nadda criticize congress party corruption crimes commission karnataka election
jp nadda criticize congress party corruption crimes commission karnataka electionSakal
Updated on

हवेरी : ‘‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, कमिशन आणि गुन्हेगारीकरण, अशा शब्दांत काँग्रेवर टीका करीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते जे. पी. नड्डा म्हणाले मी विकासासाठी मते मागण्यासाठी आलो आहे, जो यापुढेही सुरू राहील. हे आमचे निवडणुकीतील ध्येय आहे. कर्नाटक मागे राहू नये यासाठी भाजपला मतदान करा.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज शिगगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. त्याआधी बोम्मई यांच्या समर्थमार्थ नड्डा यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली होती. अभिनेता किच्चा सुदीपही त्यात सहभागी झाला होता. कित्तुरची राणी चेन्नमा हिच्या पुतळ्याला पुष्पहार घातल्यानंतर रॅलीला सुरूवात झाली.

भगव्या टोप्या आणि हातात भाजपचे झेंडे घेऊन शेकडो भाजप कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. खास रचना केलेल्या वाहनात बसलेले नड्डा, बोम्मई आणि सुदीप हे उपस्थितांना अभिवादन करीत असताना गर्दीतून त्यांचा जयजयकार होत होता.

नड्डा म्हणाले, ‘‘ विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी मी येथे आलो आहे. मोदी सरकारने देशात विकासाची गंगा आणली आहे.’’ बोम्मई आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. हा अर्ज फक्त आमदारपदासाठी नाही तर कर्नाटकला पुढे नेणारा एक मार्ग आहे.’’ नड्डा यांनी रोड शोपूर्वी सकाळी भाजपचे आमदार अरविद बेलाड यांच्या निवासस्थानी न्याहरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.