JP Nadda : आता जग आम्हाला शिकवणार का, लेडीज फर्स्ट? आम्ही 'सीताराम', 'राधेश्याम'...; नड्डा यांचे विधान

 J P Nadda
J P Naddaesakal
Updated on

नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन) आज संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान राज्यसभेत मांडण्यात आले. या विधेयकावरील चर्चेदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, आम्ही महिलांना शक्तीच्या रूपात देवी आणि समाजाला दृष्टी देणारी आदर्श म्हणून पाहिले आहे.

 J P Nadda
Dhangar Reservation: "मी आधी धनगर नंतर आमदार"; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पडळकर आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 परिषदेत भारताची विचारसरणी काय आहे हे जगाला सांगितले. भारतामध्ये अध्यात्मापासून ते अध्यापनापर्यंत महिलांनी विशेष योगदान दिल्याचं नड्डा यांनी नमूद केलं.

जेपी नड्डा राज्यसभेत म्हणाले, "गुलामगिरीच्या काळात परदा पद्धतीत मोठी घट झाली होती. मात्र अशा परिस्थितीतही भारतीय संस्कृतीत महिलांकडे ऊर्जा आणि शक्तीच्या रुपात पाहिलं जातं. आमचा शब्दसंग्रह अशा पद्धतीचा आहे की, जगाने आम्हाला लेडीज फर्स्ट शिकवावं का? आम्ही आधीच नावांमध्ये महिलांना प्रथम सन्मान देतो, असं सांगताना नड्डा यांनी सीताराम आणि राधेश्याम या नावांची उदाहरणं दिली.

 J P Nadda
MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेप्रकरणी घडामोडींना वेग! विधानसभा अध्यक्ष तातडीने दिल्लीला रवाना

राज्यसभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, आपल्या सर्वांना माहित आहे की या नवीन संसद भवनाची सुरुवात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर करण्यात आली होती. काल नारी शक्ती वंदन कायदा लोकसभेत मंजूर झाला आणि मला खात्री आहे की आज राज्यसभेत तसाच तो पास होईल. कोणत्याही अडथळ्याशिवाय एकमताने विधेयक पास होईल, असंही नड्डा यांनी नमूद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.