इलेक्ट्रिक वाहनासाठी 'ही' भारतीय कंपनी देणार कर्मचाऱ्यांना 3 लाख रुपये

कंपनीचे हे धोरण भारतात असलेल्या कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनासाठी 'ही' भारतीय कंपनी देणार कर्मचाऱ्यांना 3 लाख रुपये
Updated on

नवी दिल्ली : स्वतःची कार खरेदी (Car Perches) करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र वाहनांच्या वाढत्या किमती आणि पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Prize In India) वाढते दर या स्वप्नात नेहमीच अडसर ठरत आहे. दरम्यान, आपल्या कर्मचाऱ्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक भारतीय कंपनी पुढे आली आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट म्हणून इलेक्ट्रिक वाहने (People Attract To Buy Electric Vehicle ) खरेदी करण्यासाठी तीन लाखांचा इंसेंटिव जाहीर केला आहे. JSW समूहाने हा निर्णय घेतला असून हे धोरण १ जानेवारीपासून लागू केले जाणार आहे. कंपनीचे हे धोरण भारतात असलेल्या कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. याबाबत सोमवारी कंपनीने एक निवेदन जाहीर केले आहे. (JSW Announced Incentive For Employee )

इलेक्ट्रिक वाहनासाठी 'ही' भारतीय कंपनी देणार कर्मचाऱ्यांना 3 लाख रुपये
देशात ओमिक्रॉनचे १७०० रुग्ण; महाराष्ट्रात 500 पेक्षा जास्त

मोफत चार्जिंग सुविधा देखील उपलब्ध असेल

JSW समूहाने जाहीर केलेल्या EV धोरणांतर्गत कर्मचारी 2 किंवा 4 चाकी इलेक्ट्रिक वाहने (Electric Car Charging) खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्व JSW कार्यालये आणि प्लांटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोफत चार्जिंग स्टेशन (Free Charging Station For Electric Car) आणि पार्किंग स्लॉट (Parking Slot) उपलब्ध करून दिले जातील. कर्मचाऱ्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे हे या धोरणाचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

JSW समूह पोलाद, ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, पेंट्स, व्हेंचर कॅपिटल आणि क्रीडा यासह विविध क्षेत्रांमध्ये आहे. कंपनीने स्वतःसाठी CO2 (कार्बन डायऑक्साइड) उत्सर्जनाचे लक्ष्य देखील निश्चित केले आहे. JSW समूहाचा भाग असलेल्या JSW स्टीलने हवामान बदलाचे धोरण स्वीकारले आहे आणि 2005 आधारभूत वर्षात 2030 पर्यंत CO2 उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.