Supreme Court : 'टिंडर' अन् 'किंडल'च्या घोळात अडकले सुप्रीम कोर्टाचे जज; कोर्टरुममध्ये घडला मजेदार किस्सा

सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे शब्द आहेत. मात्र त्यातील शब्दसंगतीमुळे अनेकदा शब्दघोळ होऊन जातो. टिंडर आणि किंडलच्या बाबतीत तसंच झालं. तेही चक्क सुप्रीम कोर्टात. कोर्टरुममध्ये न्यायमूर्तींनी किंडलच्या ऐवजी चक्क टिंडर शब्द वापरला.
Supreme Court
Supreme Courtesakal
Updated on

Supreme Court News : सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे शब्द आहेत. मात्र त्यातील शब्दसंगतीमुळे अनेकदा शब्दघोळ होऊन जातो. टिंडर आणि किंडलच्या बाबतीत तसंच झालं. तेही चक्क सुप्रीम कोर्टात. कोर्टरुममध्ये न्यायमूर्तींनी किंडलच्या ऐवजी चक्क टिंडर शब्द वापरला.

अमेझॉनने लाँच केलेलं किंडल हे गॅझेट सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्या माध्यमातून पुस्तकं वाचली जातात. तर टिंडर हे सोशल मीडिया App आहे. तरुण-तरुणी डेट करण्यासाठी या अॅपचा वापर करतात. तरुणांमध्ये टिंडरचा बोलबाला असतो. याच Appचा चुकून उल्लेख झाल्याने कोर्टरुमध्ये हशा पिकला.

शुक्रवार, दि. २ फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टात हा प्रसंग घडला आहे. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्यासह न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार एका प्रकरणाची सुनावणी घेत होते.

Supreme Court
Ganpat Gaikwad Firing Video : आधी गोळ्या झाडल्या अन् मग... पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर

बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार, अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड (एओआर) स्वाती जिंदल यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेत मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी गावात ई- वाचनालय उभारण्यासाठी आणि देशभरातील गावांमध्ये वाचन चळवळ वृद्धींगत करण्याची मागणी करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात एका महिन्यापूर्वी सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीस पाठवल्या आहेत. त्यानंतर महिन्याभराने या प्रकरणात सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विक्रमजीत बॅनर्जी यांनी कोर्टात सांगितलं की, ई-लायब्ररी उभारणं आणि पुस्तकांच्या डिजिटलायझेशनची योजना सुरु आहे. यावर न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार जे बोलले त्यामुळे कोर्टरुममध्ये एकच हशा पिकला. ते म्हणाले की, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल, पुस्तकाचं पान पलटल्यानंतर जे समाधान मिळतं ते या नवीन पुस्तकामुळे मिळेल का? तुम्ही त्याला काय म्हणता टिंडर?

Supreme Court
Jasprit Bumrah IND vs ENG : रिव्हर्स स्विप, स्विच हिटच्या बादशाहचा बुमराहने उतरवला माज; पाहा VIDEO

यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना सांगितले की, सर त्या ॲपचे नाव किंडल आहे. यानंतर न्यायमूर्ती कुमार हसत हसत म्हणाले, 'होय, टिंडर एक डेटिंग ॲप आहे.' अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला सांगितले की, वापराच्या पारंपारिक पद्धती बदलल्या पाहिजेत कारण आता सर्वच ई-फॉर्ममध्ये उपलब्ध आहे, अगदी द इकॉनॉमिस्ट सारख्या व्यावसायिक प्रकाशनांमध्येसुद्धा असाच वापर केला जातो. न्यायमूर्तींच्या चुकीच्या शब्दप्रयोगामुळे कोर्टरुममध्ये हशा पिकला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()