लखनऊ- उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एक ज्यूस विक्रेता लोकांना ज्यूसमध्ये आपली लघवी मिसळून पाजवत होता. तक्रारीनंतर आरोपी ज्यूस विक्रेता आणि त्याच्या १५ वर्षाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. सदर प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. तुर्तास याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.
पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. याप्रकरणी ज्यूस विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. याशिवाय त्याच्या १५ वर्षाच्या मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यूसमध्ये लघवी मिसळून देत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांना याप्रकरणी तक्रारी मिळाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सदर प्रकार अत्यंत किळसवाणा असल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.