Junagadh Viral News : मंदिरात वाचले गेले कुराण, मुस्लिम जोडप्याने काझीसमोर केला निकाह

धार्मिक एकतेचे उदाहरण दाखवणारी ही घटना जूनागड इथून समोर आली आहे.
Junagadh Viral News
Junagadh Viral Newsesakal
Updated on

Muslim Wedding At Hindu Temple : गुजरातच्या जूनागडमध्ये मागील काही दिवसांपूर्वी दर्गा वादामुळे मोठी हिंसा झाली होती. पण नुकतीच एक धार्मिक एकता दर्शवणारी घटना समोर आली आहे. एका मुस्लिम जोडप्याचा मंदिरात निकाह झाला. यावेळी काझीपण उपस्थित होते. त्यांनीच हा निकाह संपन्न केला.

मंदिरात हे लग्न पूर्ण मुस्लिम पद्धतीने लावण्यात आले. जुनागडमध्ये अशा वेळी हा विवाह झाला आहे, जेव्हा शहरातील माजेवाडी गेटजवळ असलेल्या गेबन शाह पीरच्या दर्ग्याचे प्रकरण तापले आहे. यापूर्वीही येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या.

अब्दुल-हिनाचे लग्न

जूनागडच्या या मुस्लिम कपलचा निकाह अखंड रामनाम संकीर्तन मंदिरात झाला. मंदिरात निकाहाच्या वेळी मुस्लिम आणि हिंदू समाजाचे मान्यवर लोक उपस्थित होते. या मंदिरात २४ तास अखंड रामधून वाजत असते. आजवर या मंदिरात अनेक हिंदूंचे लग्न झाले आहेत, पण मुस्लिम निकाहाची ही पहिलीच घटना आहे.

गोंडल येथे राहणाऱ्या अब्दुल कादिर कुरेशी यांनी हीनासोबत मंदिरात इस्लाम धर्माच्या विधीनुसार निकाह कबूल केला आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली. तर दुसरीकडे सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या जुनागडच्या सत्यम सेवा युवक मंडळाने या दोन धर्माचे सुमारे 1800 विवाह पार पाडले आहेत.

Junagadh Viral News
Viral News : पोलिसाच्या बायको पोरांची नोटांच्या बंडलांसह सेल्फी अन् मग जे घडलं...

हिंदू मुस्लिम एक

सत्यम सेवा युवक मंडळाचे अध्यक्ष मनसुख भाई वाजाने यावेळी सांगितलं की, सांप्रदायिक एकता आणि हिंदू मुस्लिम समुदायात भाईचारा वाढावा म्हणून या जोडप्याचा निकाह अखंड रामनाम संकिर्तन मंदिरात करण्यात आला. यावेळी हिंदू मुस्लिम जातीच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता.

मंदिरात निकाह लावणारे मौलाना जावेद यांनी सांगितले की, शांती आणि सद्भाव कायम ठेवण्यासाठी आणि हिंदू-मुस्लिम एक आहेत याचा लोकांना धडा मिळावा म्हणून हा निकाह मंदिरात झाला. यावेळी नवदांपत्यांना काही वस्तू भेट देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.