देशभरात गाजत असलेल्या ज्योती आणि आलोक मौर्य प्रकरणाचा फटका अनेक तरुणींना बसला आहे. बिहारच्या बक्सर इथं सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीचा अभ्यास एका पतीने बंद केला आहे. पिंटू असं या व्यक्तीचं नाव सांगण्यात येत असून त्याची पत्नी खूशबू बीपीएससीची तयारी करत होती.
याबाबत पिंटूचं असं म्हणणं आहे की त्याचं त्याच्या पत्नीवर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच त्याने तिचा क्लास बंद केला आहे. आपली पत्नीही ज्योती मौर्यप्रमाणे मोठी ऑफिसर होईल आणि आपल्याला सोडून जाईल, अशी भीती त्याला वाटते. पिंटूने ज्योती मौर्याचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर आपल्या पत्नीचा क्लास बंद केला.
तर पिंटूची पत्नी खूशबूचं असं म्हणणं आहे की, तिला बीपीएससीचा क्लास करून अधिकारी व्हायचं होतं. पण ज्योती मौर्यबद्दल ऐकल्यावर पतीने क्लास बंद करून टाकला. एसडीएम ज्योती मौर्य सध्या चांगलीच चर्चेत आहेत. एसडीएम झाल्यावर ज्योतीने पतीला सोडलं आणि दुसऱ्या एका अधिकाऱ्यासोबत संबंध ठेवले असा आरोप तिच्या पतीने तिच्यावर केला आहे.
हे प्रकरण ऐकताच बिहारमधल्या पिंटूने आपली पत्नी खूशबूचा क्लास बंद केला. खूशबू प्रयागराजमध्ये क्लासला जात होती. पण पिंटूने तिला परत बोलावून घेतलं आहे आणि क्लासची फी द्यायलाही नकार दिला आहे. खूशबूने पिंटूची मनधरणी करण्याचा खूप प्रयत्न केला. पण पिंटू ऐकायला तयारच नाही. त्यामुळे तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं.
तिथे जाऊन खूशबूने पोलिसांना आपल्या पतीला समजावण्याची विनंती केली. जेणेकरून ती पुन्हा एकदा क्लासला जाऊ शकेल आणि अभ्यास करून परीक्षा देऊ शकेल. पोलीस स्टेशनमध्ये हे प्रकरण पोहोचल्यानंतर पिंटूलाही पोलिसांनी बोलवून घेतलं. खूशबूने आपला पती आणि पोलिसांसमोर हेही सांगितलं की मी ज्योती बनणार नाही, मी ‘बेवफा’ नाहीये.
याबद्दल आजतकने पिंटूशी बोलण्याचा प्रयत्न केला. पिंटू म्हणाला, “माझं माझ्या पत्नीवर प्रेम आहे. पण म्हणूनच मी तिला कोचिंग क्लासला पाठवू शकत नाही. माझ्या पत्नीचंही माझ्यावर प्रेम आहे. मी माझं प्रेम गमावू इच्छित नाही. ” पिंटूचं म्हणणं आहे की, ज्योती जोपर्यंत एसडीएम झाली नव्हती तोवर ती तिचा पती आलोकवर प्रेम करत होती. पण अधिकारी झाल्यावर लगेचच तिने आलोकला सोडलं. माझ्या पत्नीने मला अशा प्रकारे सोडावं, असं मला वाटत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.