Jyotiraditya Scindia: 'आम्ही गद्दार होतो तर...'; ज्योतिरादित्य शिंदेंचे काँग्रेसच्या टीकेला चोख प्रत्युत्तर

MP politics:शिंदे घराण्याने राणी लक्ष्मीबाईंशी विश्वासघात केला होता? कॉंग्रेसच्या टीकेला ज्योतिरादित्य शिंदेंनी दिले उत्तर
Jyotiraditya Scindia Corona Positive
Jyotiraditya Scindia Corona Positive sakal
Updated on

Jyotiraditya Scindia replied:केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेसकडून केल्या जाणाऱ्या टीकांवर पलटवार केलाय. गद्दार म्हटलं गेल्यावर शिंदे म्हणाले की जर असं होतं तर त्यांना आणि त्यांच्या वडीलांना कॉंग्रेस पक्षात सामील का केलं गेलं.

ज्यांनी इतिहासाचं एकही पान वाचल नाही, त्यांना जे बोलायचंय ते बोलूद्या. शिंदे म्हणाले की त्यांचे विचार आणि त्यांची विचारधारा मध्य प्रदेश आणि राष्ट्रासाठी समर्पित आहे.

ते म्हणाले की,"त्यांना त्यांचं काम करु द्या, ज्यांनी इतिहासाचं एक पानही वाचलं नाहीये त्यांना बोलू द्या. मी आणि माझ्या कुटुंबाचे कर्म, विचार आणि विचारधारा ही ग्वालियर, ग्वालियर संभाग, मध्य प्रदेश आणि राष्ट्रासाठी समर्पित आहे. जर त्यांना एवढीच चिंता होती, तर त्यांनी मला आणि माझ्या वडीलांना (माधवराव शिंदे) कॉंग्रेसमध्ये सामील का केलं ? "

प्रियंका गांधींच्या रॅलीमध्ये लावण्यात आले होते पोस्टर

मागच्या काही दिवसांमध्ये प्रियंका गांधींच्या दौऱ्याच्या दरम्यान पोस्टर लावण्यात आले होते की १८५७च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात शिंदेंनी राणी लक्ष्मीबाईला आणि १९६९ व २०२०मध्ये कॉंग्रेसला धोका दिला होता. मात्र, पोलिसांकडून हे पोस्टर हटवण्यात आले होते.

Jyotiraditya Scindia Corona Positive
Manipur Violence: मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओवर बृजभूषण सिंहांची प्रतिक्रिया; म्हणाले, PM मोदींनी दखल...

विश्वासघाताच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली जात आहे

२१ जुलैला प्रियंका गांधी यांनी रॅलीमध्ये बोलण्याच्या आधी विरोधक नेते गोविंद सिंह हे बोलताना म्हणाले होते की,"आधी या कुटुंबाने (शिंदे)लक्ष्मीबाईला धोका दिला आणि नंतर १९६७मध्ये कॉंग्रेसला धोका दिला (जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आजीने कॉंग्रेसचं सरकार पाडलं होतं) आणि आता आपली अब्जावधीची संपत्ती वाचवण्यासाठी कॉंग्रेसचे सरकार पाडून विश्वासघात केला."

आरोप लावताना ते म्हणाले की,"लक्ष्मीबाईंनी इथेच शेवटचा श्वास घेतला. भिंडच्या जनतेने त्यांना पाठींबा दिला. त्या ग्वालियरच्या महाराजांच्या विनंतीला मान देऊन आल्या होत्या. जर लक्ष्मीबाईंना साथ मिळाली असती, तर भारताला १०० वर्षांआधीच स्वातंत्र्य मिळालं असतं. विश्वासघाताच्या इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे."

Jyotiraditya Scindia Corona Positive
Manipur Voilance : PM मोदीं अन् स्मृती इराणींनी मणिपूरला भेट द्यावी; दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्पष्टचं बोलल्या...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()