KCR Health Update: तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर रुग्णालयात दाखल; करावी लागणार शस्त्रक्रिया?

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
KCR Health Update
KCR Health UpdateEsakal
Updated on

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, केसीआरच्या पायाला दुखापत झाली असून त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, के चंद्रशेखर राव पडले होते, त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. मात्र, दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.(Latest Marathi News)

गुरुवारी रात्री केसीआर घसरले आणि पडले, त्यानंतर त्यांना हैदराबादच्या यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. केसीआर हे गेली 10 वर्षे तेलंगणाचे मुख्यमंत्री होते.

मात्र यावेळी त्यांच्या पक्षाला निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राज्यात पूर्ण बहुमत मिळवून काँग्रेसने सरकार स्थापन केले असताना पक्ष सत्तेबाहेर आहे, रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री बनले आहेत.

के. चंद्रशेखर राव यांना पडल्यानंतर हिप फ्रॅक्चर झाले असावे, असे डॉक्टरांचे मत आहे. रात्री उशिरा त्यांना हैदराबाद येथील यशोदा रुग्णालयात नेण्यात आले. माजी मुख्यमंत्री गेल्या तीन दिवसांपासून लोकांना भेटत होते.

निवडणुकीत बीआरएसचा दारूण पराभव झाला

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने KCR यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीचा (BRS) पराभव केला होता. केसीआर यांनी 2014 ते 2023 पर्यंत तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. केसीआर यांनी तेलंगणातील दोन जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांनी गजवेलची जागा जिंकली, पण कामारेड्डीमधून त्यांचा पराभव झाला. त्यांनी कामरेड्डी जागा भाजपच्या कट्टीपल्ली वेंकट रमण रेड्डी यांच्याकडून गमावली, ज्यांनी या जागेवरून केसीआर आणि रेवंत रेड्डी यांचा पराभव केला होता.(Latest Marathi News)

KCR Health Update
Agriculture Minister: नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह दोन मंत्र्यांचे राजीनामे मंजूर; अर्जुन मुंडा भारताचे नवे कृषीमंत्री

असे लागले विधानसभा निवडणुकीचे निकाल

काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी 11 मंत्र्यांसह तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 119 पैकी तेलंगणा विधानसभेत काँग्रेसला 64 जागा मिळाल्या, तर बीआरएसला केवळ 39 जागा मिळाल्या. 2014 मध्ये तेलंगणाच्या स्थापनेनंतर बीआरएसचा हा पहिला पराभव आहे.(Latest Marathi News)

KCR Health Update
Ravishankar Prasad : दक्षिण आणि उत्तर भारत असा विभाजनाचा काँग्रेसचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.