Kerala Kalamandalam : ‘कलामंडळ’च्या विद्यार्थ्यांचा चिकन बिर्याणीवर ताव;नव्वद वर्षांनंतर प्रथमच मांसाहारी भोजन

केरळमध्ये पारंपरिक लोककला प्रकारांच्या संवर्धनाचे काम करणाऱ्या ‘केरळ कलामंडळ’ या प्रथितयश संस्थेने इतिहात प्रथमच १० जुलै रोजी आपल्या कँटीनमध्ये विद्यार्थ्यांना मांसाहारी भोजन उपलब्ध करून दिल्याची बाब उघड झाली आहे.
Kerala Kalamandalam
Kerala Kalamandalam sakal
Updated on

थ्रिसूर (केरळ) : केरळमध्ये पारंपरिक लोककला प्रकारांच्या संवर्धनाचे काम करणाऱ्या ‘केरळ कलामंडळ’ या प्रथितयश संस्थेने इतिहात प्रथमच १० जुलै रोजी आपल्या कँटीनमध्ये विद्यार्थ्यांना मांसाहारी भोजन उपलब्ध करून दिल्याची बाब उघड झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या भोजनाची मागणी केली होती. विय्यूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी तयार केलेली चिकन बिर्याणी या विद्यार्थ्यांना देण्यात आली. या संस्थेची स्थापना १९३० मध्ये झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत या संस्थेने कधीही त्यांच्या विद्यार्थ्यांना मांसाहारी भोजन दिले नव्हते. केवळ भाज्या आणि दुधापासून तयार केलेले पदार्थच जेवणामध्ये दिले जात असत. याखेपेस मात्र विद्यार्थ्यांनी मागणी केल्याने त्यांना मांसाहारी भोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

काही दिवसांपूर्वी या संस्थेमध्ये खानावळ समिती स्थापन करण्यात आली होती, त्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी मागणी केल्याने याच समितीने त्यांना चिकन बिर्याणी देण्याचा निर्णय घेतला. आता वीस जुलै रोजी याच समितीची आणखी एक बैठक होणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना अन्य मांसाहारी भोजन उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. मांसाहारी थाळीसाठी विद्यार्थ्यांना शुल्क आकारण्यात आले नव्हते.

म्हणून आक्षेप

या संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर बऱ्याचदा विविध प्रकारच्या तेलांचा वापर करून औषधोपचार केले जातात अशा स्थितीमध्ये त्यांनी मांसाहार केल्यास आरोग्याच्या गंभीर तक्रारी निर्माण होऊ शकतात, अशी भीती संस्थेमधीलच एका घटकाने व्यक्त केली होती पण हा दावा स्थानिक अभ्यासकांनी खोडून काढला होता. आतापर्यंततरी आमच्याकडे तशाप्रकारची तक्रार आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संस्थेचे ऐतिहासिक महत्त्व

केरळ कलामंडळ या संस्थेची स्थापना १९३० मध्ये प्रसिद्ध कवी पद्मभूषण व्ही.नारायण मेनन आणि त्यांचे सहकारी मनक्कुलम मुकुंदराजम यांनी केली होती. येथे कथकलीप्रमाणेच अन्य पारंपरिक नृत्य प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येते. केरळमधील थ्रिसूर जिल्ह्यात नदीच्या काठावर या संस्थेची उभारणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या संस्थेला २००६ मध्ये अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला होता. या संस्थेमध्ये अनेक पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीचे अभ्यासक्रम चालविले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com