Telangana: बहिण-भावाचा संघर्ष पेटला! जगनमोहन रेड्डींवर बहिणीचे भ्रष्टाचाराचे आरोप

कलेश्वरम प्रकल्प हा माझ्या वडिलांचाच प्रकल्प होता
Telangana
Telanganaesakal
Updated on

YSR तेलंगणा पक्षाचे प्रमुख आणि आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण YS शर्मिला यांनी तेलंगणामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. शर्मिला यांनी आरोप केला आहे की, "भारतातील सर्वात मोठा घोटाळा उघड करण्यासाठी मी येथे आले आहे, कलेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प घोटाळा मोठा आहे. कारण त्यात केवळ आभासी पैसाच नाही तर खरा पैसा आणि सरकारी तिजोरीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापरही झाला आहे.

यामध्ये सुमारे 1.2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. शर्मिला म्हणाल्या की, कलेश्वरम प्रकल्प हा माझ्या वडिलांचाच प्रकल्प होता. पण त्यांचा प्रत्येक प्रकारात विपर्यास करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये गुंतवलेल्या १.२ लाख कोटींपैकी सुमारे १ लाख कोटी रुपये केंद्रीय वित्तीय संस्थांकडून मिळाले होते.

आम्ही सीबीआय संचालकांना भेटलो आणि त्यांनी भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. कलेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प तेलंगणातील भूपालपल्ली, कलेश्वर येथे आहे, हा भारतातील गोदावरी नदीवरील बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प आहे. सध्या हा जगातील सर्वात मोठा बहु-स्तरीय उपसा सिंचन प्रकल्प आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.