कालीचरणला अटक; मध्यप्रदेशात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वादग्रस्त वक्तव्यानंतर कालीचरणच्या अडचणीत वाढ
Kalicharan Maharaj Arrest
Kalicharan Maharaj Arrestgoogle
Updated on

Kalicharan Maharaj News: कालीचरणने काही दिवसांपूर्वी धर्म संसदेत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यातच आता मध्ये प्रदेशमध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे. कालीचरणला मध्यप्रदेशच्या खजूराहो मधून अटक कऱण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रायपुर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. छत्तीसगडच्या रायपुरमध्ये झालेल्या धर्म संसदेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. (Kalicharan Maharaj Arrest News)

कालीचरण याने काही दिवसांपूर्वी धर्म संसदेत महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल अपशब्द वापरत, त्यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसेला (Nathuram Godse) नमस्कार करतो असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशभरातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला गेला होता. देशातील वेगवेळ्या राज्यांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kalicharan on Mahatma Gandhi)

Kalicharan Maharaj Arrest
काँग्रेसने देशाची माफी मागावी; भाजपची मागणी

पुण्यातही गुन्हा दाखल...

पुणे पोलिसांकडून देखील कालीचरणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या दुसऱ्या एका प्रकऱणात कालीचरणवर गुन्हा दाखल केला आहे. कालीचरण आणि मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. खडकमाळ पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी केकेलं वक्तव्य भोवलं असून, याआधी 2 ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत.19 डिसेंबरला नातूबागेतील अफझलखानाचा आनंदोत्सव साजरा कऱण्यासाठी कालीचरण आला होता. या प्रकरणात कलम 297, 298 आणि 34 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police book Kalicharan Maharaj)

Kalicharan Maharaj Arrest
मोदी म्हणजे Tiger of Hindutva; साध्वीचं ट्विट

मंत्री जितेेंद्र आव्हाडांकडून तक्रार...

तथाकथित धार्मिक नेता बाबा कालिचरण याने रायपूर येथील धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात गरळ ओकली होती. याविरोधात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी (बुधवारी) नौपाडा पोलिसांत कालिचरणविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर "आता फॅसिझमविरोधात मैदानात उतरुन लढावचं लागेल," असं ट्वीटही आव्हाड यांनी केलं.

कोरोनाबद्दल काय म्हणाला होता कालीचण...

कोरोना हा भयानक महामारी नाही. ज्या कोरोनामुळं लोकांचा मृत्यू झाला, त्या लोकांना डॉक्टरांनी (Doctor) मारलं आहे. किडनी आणि मानवी शरीरातील अवयवांची तस्करी झालेली आहे, असा धक्कादायक आरोपही कालीचरणने केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.