Kamala Harris vs. Donald Trump
Kamala Harris vs. Donald Trumpsakal

Kamala Harris vs. Donald Trump : तुमच्यासमोर मी आहे,बायडेन नाही : हॅरिस यांनी ट्रम्प यांना ठणकावले; खुल्या चर्चेत आक्रमक युक्तिवाद

Kamala Harris vs. Donald Trump : कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील खुल्या चर्चेत हॅरिस यांनी आक्रमक युक्तिवाद केला. गर्भपात कायदा, अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरण यावर त्यांनी ट्रम्प यांना कोंडीत पकडले.
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज झालेल्या पहिल्याच खुल्या चर्चेमध्ये हॅरिस यांनी आक्रमक युक्तिवाद करत ट्रम्प यांना अनेक मुद्द्यांवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ‘तुमचा लढा माझ्याबरोबर आहे, बायडेन यांच्याबरोबर नाही’, असे ठणकावून सांगत हॅरिस यांनी ही निवडणूक ट्रम्प यांना अवघड जाणार असल्याचा इशारा दिला.

Loading content, please wait...