कमला नेहरु रुग्णालयात आग; ४ चिमुकल्यांचा मृत्यू

कमला नेहरु रुग्णालयात आग; ४ चिमुकल्यांचा मृत्यू
Updated on
Summary

मृत्यू झालेल्या नवजात बालकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

भोपाळ - मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये कमला नेहरु रुग्णालयात लहान मुलांच्या वॉर्डमध्ये भीषण आग लागली. सोमवारी रात्री उशीरा लागलेल्या या आगीत चार चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यात यश आलं. दरम्यान, आगीच्या घटनेमुळे रुग्णालयात गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

रुग्णालयात आग लागल्यानं लहान मुलांच्या वॉर्डमध्ये अनेक नवजात बालके आणि डॉक्टर्स आत अडकले होते. यातील काहींना सुरङित बाहेर काढण्यात आलं. आग आटोक्यात आणण्यासाठी फतेहगढ, बैरागढ, पुल बोगदासह इतर भागातील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले होते.

कमला नेहरु रुग्णालयात आग; ४ चिमुकल्यांचा मृत्यू
पेट्रोल दरावरून भाजपचे बंगालमध्ये आंदोलन

कमला नेहरु रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आग भडकली तेव्हा वॉर्डमध्ये तब्बल ५० लहान मुलं होती. आगीची घटना समोर येताच लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तर आगीमुळे लहान मुलांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला तसंच मोठ्या संख्येनं रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी गर्दी केली होती. प्रशासनाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर नेमकं कारण समोर येईल.

राज्याचे आरोग्य मंत्री विश्वास सारंग हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. तसंच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीसुद्धा घटनास्थळी पोहोचले होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवरून या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. ते म्हणाले की, कमला नेहरु रुग्णालयात घडलेली घटना दुर्दैवी आहे. सध्या बचावकार्य वेगाने सुरु आहे. प्रशासनाची आणि बचावपथकाची टीम काम करत आहे. तसंच या घटनेचा आढावा सातत्यानं मी घेत आहे. मृत्यू झालेल्या नवजात बालकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.