Kanchanjungha Express Accident: बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात! प्रवाशांनी भरलेली कांचनजंगा एक्स्प्रेस मालगाडीला धडकली, 5 प्रवाशांचा घटनेत मृत्यू

Kanchanjungha Express Accident: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जलपाईगुडी येथे झालेल्या रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ममता म्हणाल्या, डीएम, एसपी, डॉक्टर आणि बचाव कर्मचाऱ्यांची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरू केले आहे.
Kanchanjungha Express Accident
Kanchanjungha Express AccidentEsakal
Updated on

पश्चिम बंगालमध्ये सोमवारी (17-06-2024) एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे जलपाईगुडीमध्ये प्रवाशांनी भरलेली कांचनजंगा एक्स्प्रेस मालगाडीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कांचनजंगा एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले आहेत. यामध्ये ४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती समोर आली आहे.

या भीषण रेल्वे अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक डबे रूळावरून घसरले आहेत. आज (सोमवारी) सकाळी 9.30 वाजता हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रेन क्रमांक 13174 कांचनजंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली. यानंतर कांचनजंगा एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. 4 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Kanchanjungha Express Accident
Affordable Home sales: मोठ्या शहरांमध्ये स्वस्त घरांची विक्री घटली, मार्च तिमाहीत 4 टक्के घसरण! पुणे-मुंबईत काय परिस्थिती?

ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला दु:ख

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसिडवा भागात आत्ताच झालेल्या एका भीषण रेल्वे अपघाताची बातमी ऐकून मला धक्का बसला. अद्याप माहितीची प्रतीक्षा आहे. कांचनजंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली. डीएम, एसपी, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती पथक मदतीसाठी घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

Kanchanjungha Express Accident
Kanchanjungha Express Accident: बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात! प्रवाशांनी भरलेली कांचनजंगा एक्स्प्रेस मालगाडीला धडकली, 5 प्रवाशांचा घटनेत मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.