Kanchanjunga Express Accident: 'अपघातात कोणा हात तर कोणी पाय गमावला....', बंगाल रेल्वे अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितली संपूर्ण कहाणी

Kanchanjunga Express Accident: बंगालमध्ये काल(सोमवारी)जलपाईगुडी स्टेशनपासून 30 किमी अंतरावर असलेल्या रंगपाणी स्टेशनजवळ सकाळी 8.55 च्या सुमारास हा अपघात झाला.
Kanchanjunga Express Accident
Kanchanjunga Express AccidentEsakal
Updated on

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी मोठा रेल्वे अपघात झाला. तेथे एका मालगाडीने सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला धडक दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाले आहेत. मालगाडीचा लोको पायलट आणि पॅसेंजर ट्रेनच्या गार्डचाही मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे.

न्यू जलपाईगुडी स्टेशनपासून 30 किमी अंतरावर असलेल्या रंगपाणी स्टेशनजवळ सकाळी 8.55 च्या सुमारास हा अपघात झाला. मालगाडीच्या इंजिनला धडकल्यानंतर कांचनजंगा एक्स्प्रेसचे मागील चार डबे रुळावरून घसरले. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले की, मालगाडीने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही धडक झाली. सिन्हा यांनी कबूल केले की रेल्वेची 'कवच' (ट्रेन टक्करविरोधी यंत्रणा) गुवाहाटी-दिल्ली मार्गावर सक्रिय नव्हती, जिथे अपघात झाला. रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांनी अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे.

Kanchanjunga Express Accident
Kanchanjunga Express Accident: बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा आणि चुकीची वेळ... कांचनजंगा रेल्वे अपघातावेळी नेमकं काय घडलं?

या अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याठिकाणी स्थानिक नागरिकांनी सोमवारी बकरीद सण साजरा केला नाही. संपूर्ण गाव बचाव आणि मदत कार्यात करत होते. स्थानिकांनी जखमींना बोगीतून बाहेर काढून वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले. या संपूर्ण घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

Kanchanjunga Express Accident
Kanchanjunga Express Accident: कांचनजंगा एक्स्प्रेसचे डबे उडाले, मालगाडीची मागून धडक! भीषण अपघात कसा घडला? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

निर्मलज्योत परिसरात बकरीद साजरी झाली नाही

हा रेल्वे अपघात सिलिगुडीच्या निर्मलज्योत भागात झाला. अपघातामुळे निर्मलज्योत परिसरातील ग्रामस्थांनी सोमवारी बकरीद साजरी केली नाही. आता इथले लोक आज म्हणजेच मंगळवारी बकरीद साजरी करतील. गावकऱ्यांनीच निर्णय घेतला होता. स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, अपघात झाला तोपर्यंत आम्ही ईदची नमाज अदा केली होती. अपघातामुळे शोकाचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघाताची माहिती ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या अपघाचामध्ये कुणाचा हात कापला गेला, कुणाचा पाय. कुणाच्या डोक्याला जखमा होत्या. आम्ही त्या लोकांना बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून बचावकार्यात मदत केली. गावात सुमारे 80 घरे आहेत.

Kanchanjunga Express Accident
Kanchanjungha Express Accident: बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात! प्रवाशांनी भरलेली कांचनजंगा एक्स्प्रेस मालगाडीला धडकली, 5 प्रवाशांचा घटनेत मृत्यू

तरुणांनी एकत्रित जमून मदतकार्य केले

दुसऱ्या एका स्थानिकाने सांगितले की, हा अपघात सकाळी 8.30 वाजता झाला. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा खूप मोठा आवाज आला. एक्स्प्रेस गाडीला सिग्नल मिळू शकला नाही. दरम्यान, मागून आलेल्या मालगाडीने त्याला धडक दिली. अपघातातील जखमींना आणि इतरांना वाचवण्यासाठी तरुणांनी एकत्रित जमून मदतकार्य केले. जवळपास 30-40 लोकांनी मिळून बचावकार्य केले.

स्थानिक रहिवासी 21 वर्षीय हसन यांनी सांगितले की, आम्ही लोक ओरडताना आणि मदतीसाठी याचना करताना ऐकले. तिथे गेल्यावर मी पाहिले की लोक बोगीत अडकले होते. आम्ही त्याला बाहेर काढून वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले. आम्ही लोकांना बाहेर काढले तेव्हा ते वाईट अवस्थेत अडकले होते. आम्ही आमच्या वाहनातून सुमारे 12-15 लोकांना रुग्णालयात पाठवण्यास मदत केली. या अपघातात कांचनजंगा एक्स्प्रेसच्या मागील दोन बोगींचे पूर्ण नुकसान झाले आहे.

Kanchanjunga Express Accident
Railway Accident History : ९ रेल्वे अपघात ज्यांनी संपूर्ण देशाला हादरवलं; जाणून घ्या भीषण अपघातांचा इतिहास

मालगाडीच्या जखमी चालकाला काढलं बाहेर

हसन यांनी सांगितले की, मालगाडीत दोन चालक होते. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. मालगाडीच्या जखमी चालकाला आम्ही बाहेर काढले होते. त्यावेळी ड्रायव्हर बोलण्याच्या अवस्थेत होता. आम्ही अपघात कसा झाला असे विचारले असता त्याने सांगितले की मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेसला धडकली आणि नंतर तो बेशुद्ध झाला. आम्ही त्याला वैद्यकीय महाविद्यालयात नेले.

नमाज अदा करून गावकरी परतत होते

दुसऱ्या स्थानिक रहिवाशाने सांगितले की, आम्ही पाहिले की मालगाडी वेगाने आली आणि कांचनजंगा एक्सप्रेसला जोरात धडकली. लोक ओरडू लागले. आम्ही नमाज अदा करून आलो आणि मदत करू लागलो. त्यानंतर जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. हे जखमी बहुधा जनरल बोगीतून प्रवास करत होते. लोक बचावासाठी विनवणी करत होते आणि त्यांची अवस्था वाईट होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.