Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक एसपी वैद यंनी १९९९ मध्ये झालेल्या अझहर मसूदच्या सुटकेवर मौन सोडलं आहे. एसपी वैद यांनी म्हटलं की, १९९९ मध्ये कुख्यात आयसी-८१४ अपहरणावेळी ओलिसांच्या बदल्यात दहशतवादी मौलाना मसूद अझहरची सुटका करणं सगळ्यात लाजीरवाणा प्रसंग होता.
माध्यमांसोबत संवाद साधताना ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी सगळ्यात आधी अनेक आतंकवाद्यांच्या सुटकेची मागणी केली होती. या सगळ्या मागण्या आयएसआयच्या सांगण्यावरुन होत होत्या. परंतु या प्रकरणात कठीण तडजोड झाली.
''आमचे जेवढे लोक यात सहभागी झाले होते, त्यांना त्यावेळी कठीण निर्णय घेतला आणि शेवटी तीन दहशतवाद्यांना सोडण्याचं ठरलं.''
एसपी वैद पुढे म्हणाले, त्या तिघांमध्ये एक होता मसूद अझहर. जेव्हा मी त्याला घेण्यासाठी गेलो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हसू होतं. त्याला इथून जिवंत जाऊ नाही दिलं पाहिजे, असं माझं मन म्हणत होतं. नेपाळच्या काठमांडूमधील त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन १५४ प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे निघालेल्या विमानाला पाच दहशतवाद्यांनी आपल्या कब्जात ठेवलं होतं.
या दहशतवाद्यांनी विमानाला अमृतसर, लाहोर, दुबईसह अनेक ठिकाणांवर थांबायला मजबूर केलं होतं. परंतु शेवटी अफगाणिस्तानातल्या कंधार इथं हे विमान उतरलं. ही घटना सात दिवस सुरु होती. या एका प्रवाशाचा मृत्यूही झाला होता. मसूदला सोडावं लागणं, हा प्रसंग वाईट होता, असं ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.