Kangana Ranaut Maharashtra Sadan : कंगना खासदार म्हणून महाराष्ट्र सदनात ठोकणार मुक्काम? म्हणाली...

महाराष्ट्र सदनला भेट दिली, हे सदन पाहिल्यानंतर ती अक्षरशः भारावून गेली.
Kangana Ranaut
Kangana Ranaut
Updated on

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री ते खासदार असा प्रवास केलेल्या कंगना रणौतनं आज संसदेत लोकसभा सदसत्वाची शपथ घेतली. दरम्यान, तीनं महाराष्ट्र सदनला भेट दिली, हे सदन पाहिल्यानंतर ती अक्षरशः भारावून गेली. त्यामुळं आपल्याला महाराष्ट्र सदनातच राहण्याची परवानगी मिळावी इतकंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांचा सूट (प्रशस्त खोली) मिळावी अशी मागणी तिनं केल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Kangana Ranaut hints to stay in Maharashtra Sadan in Delhi as an MP)

Kangana Ranaut
Chandrashekhar Azad: "जे संविधानविरोधी काम करतील त्यांना..."; पहिल्यांदाच खासदार म्हणून काम करणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांनी स्पष्ट केली स्ट्रॅटेजी

महाराष्ट्र सदनाचं रुपडं पाहून खरंतर कंगनानं इथं राहण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी तीनं इथल्या खोल्यांची देखील पाहाणी केली. पण इतर खोल्या लहान असल्यानं आपल्याला मुख्यमंत्र्यांचा सूट राहण्यासाठी मिळावा अशी इच्छा तीनं व्यक्त केली. इतकंच नव्हे तर यासाठी तीनं महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला फोन लावला आणि मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेली प्रशस्त खोली अर्थात सूट आपल्याला राहण्यासाठी मिळावा अशी मागणी केल्याची माहिती मिळतेय. मात्र, याबाबत महाराष्ट्र सदन प्रशासनानं ही मागणी फेटाळली आहे.

Kangana Ranaut
Amol Mitkari: "चंद्रकातदादा पालकमंत्री असताना ड्रग्जच्या घटना व्यवस्थित सुरु होत्या"; मिटकरींचा खळबळजनक आरोप

दरम्यान, महाराष्ट्र सदनात महाराष्ट्रासह इतर राज्यातील काही महत्वाचे अधिकारी तसंच खासदार राहतात. त्यामुळं कंगना हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघाची खासदार असली तरी तीनं महाराष्ट्र सदनात राहण्याची इच्छा व्यक्त केली. महाराष्ट्र आपलं दुसरं घर असल्याचं सांगताना इथं आपले काही मित्र राहतात त्यांना भेटण्यासाठी आणि चहापान करण्यासाठी आपण इथं आल्याचं तिनं म्हटलं आहे. याच वेळी तिनं महाराष्ट्र सदन हे सर्वात सुंदर सदन असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.