Kangana Ranaut:कंगना म्हणाली, "माझ्या जीवाला धोका... "; थेट भाजपच्या माजी खासदाराला दिले उत्तर

Ex MP criticized SPG:राज्यसभेचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडून बॉलीवूड स्टार्स देण्यात येणाऱ्या सुरक्षेवर टीका केली होती. याला कंगणाने प्रत्युत्तर दिले आहे.
Kangana Ranaut
Kangana RanautSakal Saptahik
Updated on

Kangana Ranaut Security:आपल्या निर्भीड आणि बिनधास्त वक्तव्यांमुळे नेहमी माध्यमांच्या प्रकाशझोतात राहणारी कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आहे. राजकीय नेते आणि माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नुकताचं कंगना रनौत हीच्या सेक्युरिटीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केला होता.

त्यांनी अभिनेत्रीचं नाव न घेता टीका केली होती. यावर आता कंगना रनौतने उत्तर दिले आहे.कंगनाने म्हटलंय की माझ्या जीवाला धोका आहे. कंगनाने यावेळी आरोप केला की ती महाराष्ट्रातील राजकारणाचा बळी बनली आणि तिच्या 'कुर्बानीवर' राष्ट्रवादी लोकांनी सरकार स्थापन केलं असतं.

यावेळी कंगनाने स्वत:ला मिळालेल्या सुरक्षेचे स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न केला आणि म्हणाली की ती एक लेखिका आणि निर्माती देखील आहे आणि तिच्या जीवाला धोका आहे. कंगनाने याबद्दल ट्विटरवर बरचं काही लिहिलंय.

कंगना ट्वीटमध्ये म्हणाली की, "मी केवळ एक बॉलिवूड स्टार नाही तर एक बोलकी नागरिकही आहे, जी प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत मांडते. महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणाचं बळी मला बनवण्यात आलं. माझ्या कुर्बानीवर राष्ट्रवादी लोक सत्ता स्थापन करु शकतात. मी तुकडे गॅंगबद्दल बोलले आणि खलिस्तानी संघटनांवरही मोकळ्यापणे टीका केली."

Kangana Ranaut
Dhananjay Munde : कृषी मंत्री मुंडे यांची अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टबाबत महत्वपुर्ण भूमिका

यापुढे कंगना म्हणाली की,"मी एक चित्रपट निर्माती आणि लेखीका आहे.माझ्या पुढच्या चित्रपटांमध्ये इमर्जंसीमध्ये ब्लु स्टारचा देखील समावेश आहे. माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मी माझ्या सुरक्षेत वाढ करण्याची विनंती केली होती. यात काही चुकीचं आहे का सर ?"

सुब्रमण्यम स्वामी यांनी कंगनावर नाव न घेता केली होती टीका

सुब्रमण्यम स्वामी यांनी कंगना रनौतवर नाव न घेता टीका केली होती. त्यांनी केलेलं ट्वीट हे बॉलिवूड स्टार्सला मिळणाऱ्या सुरक्षेवर होतं. त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं की एपपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप)कडे अभिनेत्यांकडे लक्ष्य ठेवण्याचं काम सोडून दुसरं काम नाहीये का? तेही तेव्हा जेव्हा तिला आधीपासूनचं चांगली सुरक्षा देण्यात आली आहे.

Kangana Ranaut
Sharad Pawar : ''आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात काही होईल...'' शरद पवारांच्या विधानाची राज्यात चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com