विमानासाठी पैसा आहे,मात्र विद्यार्थ्यांसाठी नाही; कन्हैय्या कुमारची मोदींवर टीका

'साहेब स्वतःसाठी साडेआठ कोटींचे विमान खरेदी करु शकता.'
kanhaiya kumar
kanhaiya kumar twitter
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार आपल्या वक्तृत्वासाठी ओळखले जातात. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) म्हणतात, साहेब स्वतःसाठी साडेआठ कोटींचे विमान खरेदी करु शकता. मात्र देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निधी देऊ शकत नाही, असा टोला त्यांनी मोदींना लगावला आहे. पुढे आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, काय ही, हिप्पोक्रॅसी !! कन्हैय्या हे जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे विद्यार्थी नेते राहिले आहे. गेल्या वर्षी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ते भाजपच्या धोरणांवर नेहमी टीका-टिप्पणी करत आले आहेत.(Kanhaiya Kumar Criticize PM Modi Over Fund For AMU Kishanganj Centre)

kanhaiya kumar
स्वप्नातही वाटल नव्हतं की मंत्री व्हावे लागेल, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला

एएमयू किशनगंज कॅम्पससाठी हवाय निधी

बिहारमध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या किशनगंज केंद्र सुरु करण्यासाठी निधी हवा आहे. भारत सरकारने तो दिल्यास केंद्र सुरु होईल. निधी लवकरात-लवकर द्यावे अशी मागणी होत आहे. गुरुवारी (ता.२७) सोशल मीडियावर #FundForAMUKishanganj हा हॅशटॅग चालवला जात होता. एमआयएमच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किशनगंज केंद्रासाठी निधी द्यावा यासाठी पत्र ही पाठविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.