Kanjhwala Death Case: तरुणीला कारनं 12 किमी फरफटत नेण्याऱ्या घटनेत दिल्ली पोलिसांचा नवा खुलासा!

या प्रकरणी आधीच पाच जणांवर अटकेची कारवाई झाली आहे.
Kanjhawala Death Case
Kanjhawala Death CaseSakal
Updated on

नवी दिल्ली : माणुसकीला काळीमा फासणाऱ्या दिल्लीतील 'हिट अँड रन' केसमध्ये दिल्ली पोलिसांनी नवा खुलासा केला आहे. त्यानुसार यामध्ये आणखी दोन आरोपींचा समावेश झाला आहे. याप्रकरणी पाच जणांवर आधीच अटकेची कारवाई झाली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीमध्ये ही भीषण घटना घडली होती. यामध्ये एका २० वर्षीय तरुणीला कारनं दहा ते बारा किमीपर्यंत फरफटत नेलं होतं. यामध्ये तिचं शरीर विदृप होऊन तीचा मृत्यू झाला. (Kanjhwala Death Case Delhi Police new disclosure in incident)

Kanjhawala Death Case
Uddhav Thackeray: शिंदेंनी कवाडेंना सोबत घेऊनही ठाकरेंचच पारडं जड; जाणून घ्या कसं

अंजली सिंह असं या घटनेतील २० वर्षीय दिवंगत तरुणीचं नाव आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. दिपक खन्ना, अमित खन्ना, कृष्णन, मिथून आणि मनोज मित्तल अशी या अटक आरोपींची नावं आहेत. एफआयआरमधील माहितीनुसार, या घटनेत दीपक हा बलेनो कार चालवत होता तर अमित खन्ना हा मागे बसला होता.

Kanjhawala Death Case
Steve Smith: सुवर्णसंधी हुकली! स्मिथने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम जवळपास मोडलाच होता...

दरम्यान, दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त सागर प्रीत हुडा यांनी सांगितलं की, "चौकशीदरम्यान आम्हाला आणखी दोन आरोपी आढळून आले आहेत. यांपैकी एकाच नाव अंकुश खन्ना जो अमित खन्नाचा भाऊ आहे तर दुसऱ्या आरोपीचं नाव आशुतोष आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, “अमितकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळं अंकुशनं आरोपीला अमित कार चालवत असल्याचं खोटं बोलण्यास सांगितलं. त्यानंतर आरोपीनं पोलिसांना सांगितले की, दीपक कार चालवत होता”

हे ही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

तर दुसरा आरोपी आशुतोष हा बलेनो कारच्या मालकाचा मेव्हणा आहे. त्यानेच ही कार आणली होती आणि आरोपीला दिली होती. याप्रकरणात पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं आम्ही या दोन्ही आरोपींनाही अटक करणार आहोत. आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून आरोपींना लवकरच रोहिणी कोर्टात हजर करण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.