Belgaum : महापालिकेसमोरच पुन्हा लाल-पिवळा झेंडा लावण्याचा प्रयत्न; विरोध करत पोलिसांनी कन्नड कार्यकर्त्यांना रोखलं

याआधीही एकदा कन्नड संघटनांकडून तेथील झेंडा बदलण्याचा प्रयत्न झाला होता.
Belgaum Municipal Corporation
Belgaum Municipal Corporationesakal
Updated on
Summary

या माध्यमातून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्नही सुरू झाला आहे.

बेळगाव : महापालिका कार्यालयासमोर (Belgaum Municipal Office) अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावर नवा लाल-पिवळा झेंडा (Karnataka Flag) लावण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांनी केला; पण पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आले. या घटनेनंतर महापालिका कार्यालयाच्या परिसरातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Belgaum Municipal Corporation
High Court च्या आदेशामुळं उपमुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा; 'ही' याचिका मागे घेण्याची परवानगी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

शिवाय ध्वजस्तंभाभोवती बॅरिकेड्स लावून तेथे जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. याआधीही एकदा कन्नड संघटनांकडून तेथील झेंडा बदलण्याचा प्रयत्न झाला होता व पोलिसांनी त्याला विरोध केला होता. मात्र, रात्रीच्या वेळी पोलिस बंदोबस्तातच तेथील जुना झेंडा हटवून नवा झेंडा लावला होता. आता पुन्हा तोच प्रयत्न कन्नड संघटनांकडून केला जात आहे.

Belgaum Municipal Corporation
Bidri Election : जिल्हाध्यक्षांच्या पराभवासाठी थेट मंत्रीच मैदानात; मुश्रीफ-चंद्रकांतदादांनी आखली रणनीती, कोणाचा होणार पराभव?

पोलिसांनी त्यांना रोखले असले, तरी पुन्हा रात्री तेथे नवा झेंडा लावला जाण्याची शक्यता आहे. बेळगावात ४ डिसेंबरपासून विधिमंडळ अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बेळगावातील कन्नड संघटनांची आगळीक पुन्हा सुरू झाली आहे. गुरुवारी शहरातील इंग्रजी भाषेतील फलक फाडण्याचा व फलकांना काळा रंग फासण्याचा प्रकार झाला.

त्यानंतर झेंडा बदलण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या माध्यमातून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्नही सुरू झाला आहे. बेळगाव महापालिका कार्यालयासमोर डिसेंबर २०२० मध्ये ध्वजस्तंभ उभारून त्यावर लाल-पिवळा झेंडा फडकविण्यात आला आहे. श्रीनिवास ताळूकर, कस्तुरी भावी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही आगळीक केली आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयासमोर राष्ट्रध्वज वगळता अन्य झेंडा फडकविता येत नाही. त्यामुळे महापालिका कार्यालयासमोरील ध्वजस्तंभ व लाल-पिवळा झेंडा हटविणे आवश्‍यक आहे.

पण, तीन वर्षे लोटली तरी प्रशासनाकडून कारवाई झालेली नाही. ८ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने या झेंड्याच्या विरोधात मोठा मोर्चा काढला होता; पण तो मोर्चा कॉलेज रोडवरच रोखला होता. समितीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने महापालिकेवर भगवा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न केला होता; पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. या मोर्चाच्या आधी व नंतरही युवा समिती, महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच अन्य संघटनांकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

Belgaum Municipal Corporation
म्हादईची कायदेशीर लढाई सरकार निश्चितच जिंकेल, पण महाराष्ट्रानेही..; काय म्हणाले मुख्यमंत्री सावंत?

झेंडा हटविण्याची मागणी अनेकदा करण्यात आली; पण प्रशासनाकडून त्या झेंड्याला संरक्षण देण्यात आले आहे. बेळगावात प्रादेशिक आयुक्त व महापालिका कार्यालय अशा दोन ठिकाणी हा लाल पिवळा झेंडा अनधिकृतपणे फडकविण्यात आला आहे. या दोन्ही झेंड्यांबाबत आक्षेप नोंदवूनही ते काढण्यात आलेले नाहीत. कन्नड संघटनांच्या दबावामुळे ते दोन्ही झेंडे आजही फडकत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.