Kapil Sibal: CBIने केजरीवालांना समन्स पाठवल्यानंतर कपिल सिब्बल यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'भाजपचा हा...'

केजरीवाल यांना रविवारी सकाळी 11 वाजता तपास यंत्रणांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बोलावण्यात आले आहे.
Kapil Sibal
Kapil SibalSakal
Updated on

Delhi Liquor Scam: दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मुख्यमंत्री केजरीवाल यांना समन्स पाठवले आहे. भाजप सरकारवर निशाणा साधत कपिल सिब्बल म्हणाले की, 'हा त्रासदायक प्रकार आहे.' केजरीवाल यांना सीबीआयने रविवारी चौकशीसाठी बोलावले आहे.

यावर आता राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'भाजप सरकार सीएम केजरीवाल यांना त्रास देत आहे.'

याबाबत कपिल सिब्बल यांनी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, "सीबीआयने केजरीवाल यांना समन्स बजावले आणि भाजप म्हणतेय हा कायदा आहे... मी म्हणतो हा छळ आहे!" (Kapil Sibal on CBI summoning Arvind Kejriwal Persecution on course )

केंद्रीय मंत्री असलेले कपिल सिब्बल यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात काँग्रेस सोडली होती आणि समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने ते स्वतंत्र सदस्य म्हणून राज्यसभेवर निवडून आले होते.

Kapil Sibal
Mehul Choksi: फरार मेहुल चोक्सीने न्यायालयीन लढाई जिंकली; भारतात आणणे झाले अवघड

सीबीआयने जारी केलेल्या नोटीसनुसार, केजरीवाल यांना रविवारी सकाळी 11 वाजता एजन्सीच्या मुख्यालयात या प्रकरणातील साक्षीदार म्हणून तपास यंत्रणांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांना 16 एप्रिलला हजर राहण्यासाठी समन्स बजावले.

आम आदमी पार्टीने (AAP) याला षड्यंत्र म्हटले आहे. कथित दारू धोरण घोटाळ्याचे "मास्टरमाइंड" असल्याचा आरोप करत भाजपने शुक्रवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

केजरीवाल यांना सीबीआयकडून समन्स मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाकडूनही प्रतिक्रिया आली आहे. या प्रकरणावर बोलताना आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले की, केजरीवाल यांनी अदानी प्रकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आरोपांमुळे सीबीआयने समन्स पाठवले आहे.

आमची भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई सुरूच राहणार असल्याचे आप नेते संजय सिंह यांनी सांगितले. आम्ही कोणाला घाबरत नाही असेही ते म्हणाले.

Kapil Sibal
पाठ्यपुस्तकांत वह्यांची घुसखोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.