Kiren Rijiju: "गुड लक मित्रा, आता ..." सिब्बलांच्या कायदामंत्र्यांना निरोपाच्या शुभेच्छा !

कायदा मंत्री किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रीपदावरून हटवण्यात आलं आहे.
Kiren Rijiju
Kiren Rijiju
Updated on

कायदा मंत्री किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रीपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी अर्जुनराम मेघवाल हे नवे कायदा मंत्री म्हणून काम पाहणार आहेत. किरेन रिजीजू यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अशातच ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी ट्विट करत किरेन रिजीजू यांना निरोपाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Kapil Sibal tweet on Kiren Rijiju shifted out of Law Ministry )

कायद्या मागचं विज्ञान समजून घेणे अवघड होतं , आता विज्ञानाचे कायदे शिका, Good luck my friend ! अशा आशयाचे ट्विट कपिल सिब्बल यांनी केलं आहे आणि कायदामंत्र्यांना निरोपाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Kiren Rijiju
Jallikattu: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा

किरेन रिजीजू हे कायदा मंत्री झाल्यापासून वादग्रस्त ठरले होते. त्यांची विधाने आणि निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे भाजपच्या इमेजला तडाही जात होता. सातत्याने वादात अडकल्यामुळे रिजीजू यांचं पद जाणार असल्याचा कयास वर्तवला जात होता.

त्यानुसार आज तडकाफडकी त्यांच्याकडून कायदा मंत्रीपद काढून घेण्यात आलं. अशी चर्चा देशासह राज्याच्या राजकीय गोटात रंगली आहे.

Kiren Rijiju
Law minister: मोदींनी किरेन रिजिजूचे बदलले खाते, राजस्थान निवडणुकीआधी भाजपने फिरवली भाकरी

२०२४ लोकसभा निवडणूका तोंडावर आल्यात. त्याआधी महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका ही पार पडणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली रननीति आखण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.