Kargil Vijay Divas 2023 : कारगिल युद्धाबद्दल या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहितीयेत का?

भारत पाकीस्तानच्या त्या युद्धाला ऑपरेशन विजय म्हणूनही ओळखले जाते
Kargil Vijay Divas 2023
Kargil Vijay Divas 2023esakal
Updated on

Kargil Vijay Divas 2023 : कारगिल हे नाव ऐकल्यावर तुमच्या डोक्यात पहिल्यांदा काय येतं?. सध्या 20 ते 90 या वयोगटात असलेल्या लोकांना याबद्दल माहिती आहे. पण 20 च्या आत वय असलेल्यांना कारगिल काय होतं, तिथं काय घडलं होतं याची फार माहिती नसेल. त्याबद्दलच जाणून घेऊयात.

26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

पाकिस्तानने भारताविरुद्ध लष्करी मोहीम आखली होती. या योजनेच्या निर्मात्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे तत्कालीन प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ आणि अन्य तीन जनरल मोहम्मद अझीझ, जावेद हसन आणि महमूद अहमद यांचा समावेश होता.

Kargil Vijay Divas 2023
Kargil Vijay Diwas: 'जय हिंद, जय भारत', बॉलीवूड सेलिब्रेटींची श्रद्धांजली!

कारगिल युद्धाची सुरुवात 3 मे रोजीच झाली होती, कारण या दिवशी दहशतवाद्यांनी घुसखोरी सुरू केली होती. 26 जुलै रोजी युद्ध संपले. अशा प्रकारे भारत-पाकिस्तान एकूण 85 दिवस आमनेसामने राहिले.

भारत आणि पाकिस्तानमधील खरे युद्ध 60 दिवस चालले, ज्याला 'ऑपरेशन विजय' म्हणूनही ओळखले जाते. या दिवसाच्या निमित्तानेच आपण काही प्रश्न आणि त्याची उत्तरे तुम्हाला येतात का ते पाहणार आहोत. (Kargil Vijay Divas)

  • कारगिल युद्ध कोणत्या वर्षी लढले गेले?

A.1991

B. 1999

C. 1998

D. 1997

उत्तर – Option B

- कारगिल युद्ध हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात 3 मे ते 26 जुलै 1999 दरम्यान लढले गेले.

  • नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानचे सैन्य हटविण्यासाठी कारगिल युद्धात भारतीय लष्करात सामील झालेल्या भारतीय हवाई दलाच्या मोहिमेचे नाव काय होते?

A. ऑपरेशन विजय

B. ऑपरेशन सफेद सागर

C. ऑपरेशन जय

D. यापैकी एकही

उत्तर – Option B

युद्धकाळात भारतीय लष्कराच्या जमिनीवरील सैनिकांबरोबर संयुक्तपणे काम करण्याची भारतीय हवाई दलाची भूमिका नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानी सैन्याच्या नियमित आणि अनियमित सैनिकांना हटविण्याच्या उद्देशाने होती. या विशेष ऑपरेशनला ऑपरेशन सफेद सागर असे कोडनेम देण्यात आले होते. भारतीय हवाई दलाचे ऑपरेशन 'सफेद सागर' कारगिल युद्धाचा एक प्रमुख भाग होता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Kargil Vijay Divas 2023
Kargil Vijay Diwas: कोणत्याही राजकीय पदावर नव्हते तरी मोदी गेले होते कारगिल युद्धभूमीवर
  • कारगिल ते स्कार्दू दरम्यानचा मार्ग कधी बंद करण्यात आला?

A. 1947

B. 1948

C. 1945

D. 1949

उत्तर - Option C

पाकिस्तानचे स्कार्दू शहर सैनिकांना सहजपणे शस्त्रे पुरवू शकत होते आणि ते आणि कारगिल दरम्यान एक रस्ता होता. 1949 मध्ये हा रस्ता बंद करण्यात आला.

  • कारगिलसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

1 ) हा लडाखच्या बाल्तिस्तान जिल्ह्याचा एक भाग होता.

2) 1948 च्या काश्मीर युद्धानंतर तो एलओसीने वेगळा केला.

A. i

B. ii

C. i आणि ii

D. यापैकी काहीच नाही

उत्तर – Option C

कारगिल 1947 मध्ये भारताच्या फाळणीपूर्वी लडाखच्या बाल्टिस्तान जिल्ह्याचा भाग होता आणि पहिल्या काश्मीर युद्धानंतर (1947-1948) एलओसीने वेगळा झाला.  

Kargil Vijay Divas 2023
Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती देणारा खरा खुरा शेर शाह कोण होता ?
  • कारगिल युद्धादरम्यान काश्मीरमध्ये पाकिस्तानी घुसखोरी मोहिमेचे नाव काय होते?

 A.ऑपरेशन बद्र

B. ऑपरेशन सिंधू

C. ऑपरेशन गजनी

D. यापैकी एकही उत्तर नाही

उत्तर – Option A

पाकिस्तानी सैन्याने आपले सैनिक आणि निमलष्करी दल नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत पाठवण्यास सुरुवात केली आणि घुसखोरीचे कोड-नेम "ऑपरेशन बद्र" असे होते. (Kargil War Marathi)

  • कारगिल युद्ध स्मारक कोठे आहे?

 A. वाघा बॉर्डर

B. टायगर हिल, लडाख

C. गेट वे ऑफ इंडिया

D. शिमला मॉल रोड

उत्तर – Option B

टायगर हिल, लडाख हा तो भाग आहे जिथे कारगिल युद्ध स्मारक आहे. याला द्रास मेमोरियल असेही म्हणतात.

Kargil Vijay Divas 2023
Kargil Vijay Diwas: भारताचा पराक्रमी पंतप्रधान जो युद्धावेळी चक्क रणांगणात तळ ठोकून राहिला..
  • कारगिल युद्धात अंदाजे किती सैनिक मारले गेले?

 A. सुमारे 200

B. सुमारे 345

C. सुमारे 298

D. सुमारे 527

उत्तर. Option D

स्पष्टीकरण : कारगिल युद्धात सुमारे 527 सैनिक मारले गेले. (Kargil war quiz marathi )

  • कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान कोण होते?

A. परवेझ मुशर्रफ

B. नवाझ शरीफ

C. शाहीद खान अब्बासी

D. शौकत अझीझ

उत्तर – Option B

कारगिल युद्धाच्यावेळी नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होते.

Kargil Vijay Divas 2023
Kargil Vijay Diwas : वडील मला कारगील युद्धातून फोन करायचे,अनुष्का गर्वाने सांगते वडिलांचे किस्से
  • भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे?

A. परमवीर चक्र

B. अर्जुन पुरस्कार

C. महावीर चक्र

D. कीर्ती चक्र

उत्तर. Option A

परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.

  • कारगिलमधील लोक कोणती बोली भाषा बोलतात?

A. बलती पुरगी

B. किश्तवारी

C. कोशूर

D. यापैकी एकही

उत्तर – Option A

बलती पुरगी ही कारगिलमधील लोकांद्वारे बोलली जाणारी बोली भाषा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.