Kargil Vijay Diwas 2021: भारतीय सैन्याचा सर्वोच्च पराक्रम

डोंगराळ भागातील लढाईत भारताने पाकिस्तानला धुळ चारली होती.
Kargil
Kargil
Updated on

भारतासाठी आजचा दिवस खास आहे. कारण याच दिवशी भारताने कारगिलच्या लढाईत पाकिस्तानवर विजय (india pakistan war) मिळवला होता. दरवर्षी २६ जुलै हा दिवस 'कारगिल विजय दिन' (Kargil Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो. १९९९ साली कारगिलमध्ये ६० पेक्षा जास्त दिवस हे युद्ध लढले गेले. डोंगराळ भागात (mountain war) लढल्या गेलेल्या या युद्धात भारतीय सैन्याने (indian army) आपला सर्वोच्च पराक्रम दाखवला व पाकिस्तानला पळवून लावत आपला भूभाग परत मिळवला. (Kargil Vijay Diwas 2021 India won war against pakistan in 1999 PM Modi tweet special message dmp82)

पाकिस्तानने मैत्रीच्या नावाखाली दगाबाजी करत, कारगिलमधील महत्त्वाच्या भागांमध्ये घुसखोरी केली होती. या घुसखोरांमध्ये पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी दोघेही होते. उंच टेकड्यावरुन पाकिस्तानी सैन्य भारतीय महामार्गाला सहजतेने लक्ष्य करु शकत होते. त्यामुळे शत्रूला त्या भागातून हुसकावून लावण्याचे आव्हान सैन्यासमोर होते.

शत्रू उंचावर बसला होता. त्यामुळे ही लढाई सोपी नव्हती. १९९९ च्या त्या काळात भारताची गुप्तचर यंत्रणा, टेहळणी क्षमता तितकी मजबूत नव्हती. शिवाय डोंगराळ प्रदेशात लपलेल्या शत्रूवर अत्यंत अचकूतेने हल्ला करणाऱ्या शस्त्रांची कमतरता होती. पण या सर्व आव्हानावर मात करत भारतीय सैन्याने आपले सर्वोच्च शौर्य, पराक्रम दाखवत पाकिस्तानवर विजय मिळवला. त्यामुळे दरवर्षी २६ जुलैला त्या पराक्रमी योद्ध्यांना देशभरातून नमन केले जाते.

Kargil
बापरे! लोकलमधील १५ लाख प्रवासी संख्या घटली, जाणून घ्या सविस्तर

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने कारगिल युद्धातील शहीदांना आदरांजली वाहताना त्यांच्या शौर्याला सलाम केला आहे. "त्यांचे बलिदान आम्ही विसरलेलो नाही. त्यांचा पराक्रम आमच्या लक्षात आहे. कारगिलमध्ये मातृभूमीचे रक्षण करताना प्राणांचे बलिदान देणाऱ्या त्या वीरांना आम्ही आदरांजली वाहतो. त्यांचे शौर्य दरदिवशी आम्हाला प्रेरणा देत असते" असे पंतप्रधान मोदींनी आपल्या टि्वटरवरील संदेशात म्हटले आहे.

Kargil
BMC: 'या' कारणांमुळे 'वरळी ते नरिमन' सागरी किनारी मार्गात अडथळे!

कारगिल युद्धातील प्रमुख घडामोडी

- कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली.

- टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरले.

१९९९च्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम...

- ४ मे : कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली.

- ५ ते १५ मे : या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते.

- २६ मे : भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.

- २७ मे : भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.

- ३१ मे : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती दिली.

- १० जुन : पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती.

- १२ जून : दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चर्चेनंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच घुसखोरांनी परत जायला हवे असे सांगितले.

- १५ जून : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली

- २९ जून : भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या.

- ४ जुलै : संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली.

- ५ जुलै : शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली.

- ११ जुलै : पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली.

- १४ जुलै : भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला.

- २६ जुलै : कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.