नवी दिल्ली: आज कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) आहे. भारताने पाकिस्तानवर युद्धात (india-pakistan war) मिळवलेल्या विजयाला २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. कारगिल युद्धाच्यावेळी (kargil war) व्ही.पी. मलिक (vp malik) भारताचे लष्करप्रमुख होते. या युद्धाच्यावेळी नेमकी काय स्थिती होती?, आपण कसे लढलो? त्यातून आपण काय शिकलो? आणखी सूट मिळाली असती, तर भारतीय सैन्य काय करु शकलं असतं? या मुद्यांकडे व्ही.पी.मलिक यांनी लक्ष वेधलं आहे. (We should have been allowed to capture Pakistan territory General VP Malik dmp82)
"ऑपरेशन विजय' हे राजकीय, लष्करी आणि कुटनितीक निर्धाराने उचललेले पाऊल होते. यामुळे आम्हाला कठिण, खडतर परिस्थितीला लष्करी आणि कुटनितीक विजयामध्ये बदलता आले. पाकिस्तान त्याच्या उद्देशामध्ये अपयशी ठरला. त्यांना त्याची लष्करी आणि राजकीय किंमत चुकवावी लागली. दुसऱ्याबाजूला भारतीय गुप्तचर यंत्रणेकडे ठोस माहिती नव्हती. टेहळणी क्षमता कमकुवत होती. त्यामुळे शत्रूला ओळखून, योग्य ती कारवाई करायला थोडा वेळ लागला. पण रणांगणावर मिळालेले लष्करी यश, यशस्वी राजकीय, लष्करी रणनिती यामुळे भारताला आपल्या उद्दिष्टात यश प्राप्त झाले. एक जबाबदार लोकशाही देश म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावता आली" असे मलिक यांनी सांगितले.
"युद्धाला सुरुवात झाली, तेव्हा पाकिस्तानने जी आश्चर्यकारक स्थिती निर्माण केली होती, त्याला आम्ही उत्तर देत होतो. गुप्तचरांची माहिती आणि टेहळणीमध्ये कमी पडल्यामुळे घुसखोरांची ओळख पटवण्यावरुन गोंधळाची स्थिती होती. घुसखोर नेमके कुठे लपलेत, त्यांचा ठावठिकाणा कळत नव्हता" असे मलिक यांनी सांगितले.
त्यामुळे पुरेशी माहिती मिळवणे, परिस्थिती स्थिर होणे आणि त्यानंतर पाऊल उचलणे आवश्यक होते. "काही काळानंतर कारगिलमध्ये यश मिळणार, याची भारतीय सैन्यदलांना खात्री पटली. त्यावेळी शस्त्रसंधी करण्याआधी भारतीय सैन्याला LOC पार करुन, पाकिस्तानचा काही भूभाग ताब्यात घ्यायची परवानगी द्यायला हवी होती" असे मलिक यांनी म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.