Kargil Vijay Diwas: कोणत्याही राजकीय पदावर नव्हते तरी मोदी गेले होते कारगिल युद्धभूमीवर

कारगिल युद्धातील शूर सैनिकांशी पंतप्रधान मोदींचे संबंध खूप जवळचे होते.
Kargil Vijay Diwas
Kargil Vijay Diwas sakal
Updated on

आज कारगिल विजयाला 24 वर्षे पूर्ण होत आहेत. 26 जुलै हा देशवासीयांसाठी विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भारताने कारगिलमध्ये मोठा विजय मिळवला जो आजही देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेला आहे. या कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैन्यांनी पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावले होते. या युद्धादरम्यान अनेक सैन्य शहीद झाले.

याच युद्धाच्यावेळी अनेकांनी कारगिलला जाऊन जवानांचा भेट घेतली होती. पण तुम्हाला माहिती आहे का या भेट घेणाऱ्या व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे.

Kargil Vijay Diwas
Kargil Vijay Diwas : उणे ४० डिग्री तापमान, पाक सैनिकावर झेप घेतली अन्...; बारामतीच्या जवानाचा लढा

कारगिल युद्धातील शूर सैनिकांशी पंतप्रधान मोदींचे संबंध खूप जवळचे होते. 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान, मोदी यांना कारगिलला आणि देशाच्या शूर सैनिकांना भेट देण्याची सुवर्ण संधी मिळाली होती. हा तो काळ होता जेव्हा नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये त्यांच्या पक्षासाठी काम करत होते.

कारगिलला भेट देण्याचा आणि सैनिकांशी संवाद साधण्याचा अनुभव मी कधीही विसरणार नाही, असे त्यांनी कारगिल युद्धाची आठवण करताना म्हटले.

Kargil Vijay Diwas
Kargil Vijay Diwas : लवकरच थिएटर कमांड : राजनाथ सिंह

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळातच युद्धस्मारक उभारणीची घोषणा केली होती. स्वतंत्र भारतात नेहरू सत्तेवर बसले तेव्हापासून अशा युद्धस्मारकाची मागणी होत होती.मात्र मोदींनी हे त्यांच्या कार्यकाळातच करुन दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.