Karnataka CM: मुख्यमंत्र्यांच्या विरोधात चालणार खटला राज्यपालांनी दिली परवानगी; काय आहे 'मुडा' भ्रष्टाचार प्रकरण?

Siddaramaiah: ही जमीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना त्यांचा भाऊ मल्लिकार्जुन स्वामी यांनी भेट दिली होती. ती संपादित न करताच मुडाने देवनूर तिसऱ्या टप्प्याची योजना विकसित केल्याचा आरोप आहे.
Karnataka CM Siddaramaiah
Karnataka CM SiddaramaiahEsakal
Updated on

मुडा भ्रष्टाचार प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या चांगलेच अडकले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने आघाडी उघडली असून आता राज्यपालांनीही मुडा प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यास मान्यता दिली आहे.

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी अलीकडेच MUDA (म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण) च्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यासाठी मंत्रिमंडळाचा अभिप्राय मागवला होता.

यानंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यामध्ये राज्यपालांना कारणे दाखवा नोटीस मागे घेण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच बहुमताने निवडून आलेले सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मंत्रिमंडळाने म्हटले होते.

मात्र, राज्यपालांनी याबाबत कायदेतज्ज्ञांचे मत घेतले. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे.

या प्रकरणात, तक्रारदारांनी मुडा प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्याची परवानगी मागितली होती.

भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते टीजे अब्राहम आणि इतर अनेक तक्रारदारांनी आरोप केला आहे की मुडा घोटाळ्यातील बेकायदेशीर वाटपामुळे राज्याचे 45 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

या तक्रारीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांची पत्नी, मुलगा आणि मुडा आयुक्त यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची मागणी करण्यात आली आहे.

म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण किंवा MUDA ही कर्नाटकची राज्यस्तरीय विकास संस्था आहे. या एजन्सीचे काम शहरी विकासाला चालना देणे आणि दर्जेदार पायाभूत सुविधा विकसित करणे हे आहे. तसेच ही संस्था नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरेही उपलब्ध करून देते.

मुडाने शहरी विकासादरम्यान ज्या लोकांना जमीन गमावली त्यांच्यासाठी एक योजना आणली. 50:50 नावाच्या या योजनेत, जमीन गमावलेल्या लोकांना विकसित जमिनीच्या 50% वाटा मिळण्याचा हक्क होता. ही योजना 2009 मध्ये पहिल्यांदा लागू करण्यात आली. जी 2020 मध्ये तत्कालीन भाजप सरकारच्या काळात बंद करण्यात आली होती.

Karnataka CM Siddaramaiah
Kolkata Doctor Rape: जी जीवदान देते तिचाच बलात्कार केला... डॉक्टरांची केंद्रीय संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी, काय आहे हा अ‍ॅक्ट?

योजना बंद झाल्यानंतरही मुडाने 50:50 योजनेंतर्गत जमिनी संपादित करून वाटप सुरूच ठेवल्याचा आरोप आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना या अंतर्गत लाभ दिल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची 3 एकर 16 गुंठे जमीन मुडाने संपादित केल्याचा आरोप आहे. त्या बदल्यात, उच्च श्रेणीतील 14 साईट्सवर त्यांना लाभ देण्यात आला आहे.

म्हैसूरच्या बाहेरील केसारे येथील ही जमीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना त्यांचा भाऊ मल्लिकार्जुन स्वामी यांनी २०१० मध्ये भेट म्हणून दिली होती. ही जमीन संपादित न करताच मुडाने देवनूर तिसऱ्या टप्प्याची योजना विकसित केल्याचा आरोप आहे.

Karnataka CM Siddaramaiah
Sabarmati Express Accident: रेल्वे पुन्हा घसरली, साबरमती एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून खाली; पाहा व्हिडिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.