'राज्यात एकही जागा 150 पेक्षा कमी आणू नये. तुम्हाला तुमची जबाबदारी मनापासून पार पाडावी लागेल.'
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) पुन्हा सक्रिय झाले आहेत. वाढती बेरोजगारी आणि महागाईवरून केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारवर सातत्यानं ते निशाणा साधत आहेत. देशाची अर्थव्यवस्था कोलमडलीय, असं राहुल गांधी यांनी बंगळुरूमध्ये (Bangalore) म्हंटलंय. आपल्या देशात बेरोजगारी आणि महागाई वाढलीय. भाजप लोकांना रोजगार देऊ शकत नाहीय. कारण, त्यांनी रोजगार देणारी क्षेत्रं उद्ध्वस्त केली आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केलाय.
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार निशाणा साधलाय. आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडलीय. बेरोजगारी आणि महागाई झपाट्यानं वाढत आहे. नोटाबंदी, चुकीची जीएसटी, शेतकरी बिल यामुळं देशाचं खूप नुकसान झालंय. आज देशाची स्थिती खूपच बिकट आहे. भाजप सरकार रोजगार देऊ शकत नाहीय, कारण देशाला रोजगार देणारी सत्ता भाजपनं उद्ध्वस्त केलीय, असा त्यांनी घणाघात केलाय.
कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party in Karnataka) सरकारवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, देशातील सर्वात भ्रष्ट सरकार कर्नाटकचं सरकार आहे. ही मुळात आर्थिक हस्तांतरणाची यंत्रणा आहे. गरिबांकडून पैसे घ्या आणि 2-4 उद्योगपतींना द्या, ही त्यांची व्यवस्था आहे. भाजपचा उद्देश गरिबांचा पैसा हिसकावून श्रीमंतांना द्यायचा आहे. त्यांना देशाचं विभाजन करायचं आहे, पण आम्हाला अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीसारखे खरे मुद्दे मांडायचे आहेत. आम्हाला राष्ट्र एकत्र करायचं आहे. तसंच आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसनं तरुण आणि महिलांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असंही राहुल गांधींनी शेवटी सांगितलं.
आज राहुल गांधी यांनी काँग्रेससाठी 150 हून अधिक जागांचं लक्ष्य ठेवून राज्यात पक्षाच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केलीय. ते म्हणाले, राज्यात एकही जागा 150 पेक्षा कमी आणू नये. तुम्हाला तुमची जबाबदारी मनापासून पार पाडावी लागेल. तुम्ही सर्वांनी मिळून काँग्रेस पक्षाला 150 जागा जिंकून द्यायच्या आहेत. राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar), माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत पक्षाच्या बैठका घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.