Anand Mamani : कत्तींनंतर भाजपच्या आणखी एका आमदाराचं निधन; आनंद मामनींनी 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मामनी हे विधानसभेचे उपसभापती आणि तीन वेळा भाजपचे आमदार राहिले आहेत.
Anand Mamani Passes Away
Anand Mamani Passes Away esakal
Updated on
Summary

मामनी हे विधानसभेचे उपसभापती आणि तीन वेळा भाजपचे आमदार राहिले आहेत.

Anand Mamani Passes Away : कर्नाटक विधानसभेचे उपसभापती आणि तीन वेळा भाजपचे आमदार राहिलेले आनंद मामनी (Anand Mamani) यांचं शनिवारी रात्री उशिरा निधन झालं. गेल्या महिनाभरापासून त्यांची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात येत आहे.

56 वर्षीय मामनी यांना मधुमेह (Diabetes) होता आणि त्यांना यकृताचा संसर्ग झाला होता. बंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात (Manipal Hospital Bangalore) त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुरुवातीला वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांना चेन्नई आणि नंतर मणिपाल रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून ते कोमात होते.

Anand Mamani Passes Away
Bilkis Bano Case : PM मोदी-अमित शहांनी सैतानाला बाहेर सोडून दिलंय; TMC खासदाराचा गंभीर आरोप

मामनी हे सौंदत्ती मतदारसंघाचे (Saundatti Constituency) आमदार होते. त्यांचं पार्थिव आज (रविवार) त्यांच्या गावी आणून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. मामनी यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देखील दु:ख व्यक्त केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.