BJP News : मोदींचं लक्ष असलेल्या राज्यात भाजपला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) तोंडावर राजकीय पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.
Karnataka Assembly Election
Karnataka Assembly Electionesakal
Updated on
Summary

BJP News: पुत्तन्ना हे चार वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी बेंगळुरू अर्बन, बेंगळुरू ग्रामीण आणि रामनगर जिल्ह्यांतील शिक्षक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) तोंडावर राजकीय पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (BJP) गुरुवारी मोठा झटका बसला आहे.

इथं भाजपकडून चार वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिलेले दिग्गज नेते पुत्तन्ना यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Karnataka Assembly Election
DK Shivakumar : भाजपला धक्का बसणार? अनेक आमदार काँग्रेसच्या वाटेवर, प्रदेशाध्यक्षांचा मोठा गौप्यस्फोट

पुत्तन्ना यांना एआयसीसीचे सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला (Randeep Singh Surjewala), एलओपी सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी काँग्रेसचं (Congress) सदस्यत्व दिलं. एक दिवसापूर्वी पुत्तन्ना यांनी वैयक्तिक कारणास्तव भाजपच्या एमएलसी आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

Karnataka Assembly Election
Asaduddin Owaisi : 'ज्यांनी नवाब मलिकांना तुरुंगात टाकलं त्यांनाच..'; भाजपला पाठिंबा दिल्यामुळं ओवैसींचा पवारांवर निशाणा

पुत्तन्ना हे चार वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी बेंगळुरू अर्बन, बेंगळुरू ग्रामीण आणि रामनगर जिल्ह्यांतील शिक्षक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. पुत्तन्ना यांची ऑक्टोबर 2020 मध्ये विधान परिषदेवर पुन्हा निवड झाली आणि त्यांचा कार्यकाळ ऑक्टोबर 2026 मध्ये संपणार होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.