Karnataka Election : विश्‍वासघाताची किंमत भाजपला लागली चुकवावी; नऊ वर्षांत बदलले चार मुख्यमंत्री

मुख्यमंत्री बदलामुळे अनेकदा नाराजी ओढवून घ्यावी लागली आहे. त्याचा परिणामही भाजपला भोगावा लागला आहे.
Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Election 2023esakal
Updated on
Summary

धजदच्या कुमारस्वामी यांचा अठरा महिन्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. अखेरचे अठरा महिने भाजपला मुख्यमंत्रीपद मिळणार होते, पण कुमारस्वामींनी त्यांना मुख्यमंत्रपद दिले नाही.

Karnataka Assembly Election 2023 : यंदाच्या निवडणुकीत कर्नाटकात स्वबळावर सत्ता मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोर लावला आहे. पण, भाजपचा (BJP) कर्नाटकातील सत्तेचा इतिहास पाहिला, तर मुख्यमंत्री बदलाचा ट्रेंड पक्षासाठी हानिकारक ठरला आहे.

२०२३ साली राज्यात भाजपची सत्ता आली, तर लिंगायत समाजाला (Lingayat Community) मुख्यमंत्रिपद दिले जाईल, असे भाजपने जाहीर केले आहे. पण, सत्ता आली व लिंगायत मुख्यमंत्री झाला, तरी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार का? याची चर्चाही आतापासूनच राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कर्नाटकातील मतदारांना भाजपला बहुमत दिले, तरी मुख्यमंत्री बदलामुळे अनेकदा नाराजी ओढवून घ्यावी लागली आहे. त्याचा परिणामही भाजपला भोगावा लागला आहे.

पक्षातील ज्येष्ठ आमदारांना मिळालं मंत्रीपद

२००८ साली झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. २००६ साली भाजपने धर्मनिरपेक्ष जनता दलासोबत हातमिळवणी करून राज्यातील सत्तेत भागिदारी मिळविली. त्यामुळे बी. एस. येडियुराप्पा यांना उपमुख्यमंत्रीपद तर पक्षातील ज्येष्ठ आमदारांना मंत्रीपद मिळाले होते. सत्ता मिळाल्यामुळे भाजपला राज्यात पक्ष संघटना वाढविण्यास मदत झाली.

धजदने केला भाजपचा विश्‍वासघात

पण, धजदच्या कुमारस्वामी यांचा अठरा महिन्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. अखेरचे अठरा महिने भाजपला मुख्यमंत्रीपद मिळणार होते, पण कुमारस्वामींनी त्यांना मुख्यमंत्रपद दिले नाही. त्यावेळी धजदचा पाठिंबा मिळणार हे गृहीत धरून येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली, पण धजदने पाठिंबा न दिल्याने त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. धजदने विश्‍वासघात केल्याचा आरोप त्यावेळी भाजपने केला व तोच मुद्दा घेऊन भाजप निवडणुकीला सामोरे गेले. त्यामुळे सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत २००८ साली भाजपने ११० जागा मिळविल्या.

Karnataka Assembly Election 2023
Karnataka Election : तब्बल 50 ठिकाणी अटीतटीची लढत; पाच हजारांपेक्षा कमी मतांनी 40 उमेदवार पराभूत

येडीयुराप्पांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

चार अपक्ष आमदारांचा पाठिंबा घेत भाजपने त्यावेळी राज्यात सत्ता स्थापन केली व येडीयुराप्पा मुख्यमंत्री झाले. ऑपरेशन कमळच्या माध्यमातून भाजपने आपले संख्याबळही वाढविले. पण भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे येडीयुराप्पा यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द झाकोळली. त्यांना कारगृहातही जावे लागले. येडीयुराप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. त्यामुळे पक्षातील शीर्ष नेतृत्वाने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. जुलै २०११ मध्ये येडीयुराप्पा यांनी आपल्या समर्थक आमदारांसह राजभवनात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सदानंद गौडा राज्याचे मुख्यमंत्री झाले.

Karnataka Assembly Election 2023
Karnataka Election : अण्णा हजारेंकडून घेतली प्रेरणा; पदाचा राजीनामा देत न्यायाधीश उतरले थेट रिंगणात

2013 साली भाजपला सत्ता गमवावी लागली

राज्यात लिंगायत मुख्यमंत्री हवा, अशी मागणी जोर धरू लागली. त्यामुळे गौडा यांना हटवून २०१२ साली जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यामुळे पाच वर्षात भाजपने कर्नाटकात तीन मुख्यमंत्री दिले. या साठमारीमुळे व येडीयुरांप्पा यांनी पक्ष सोडल्यामुळे २०१३ साली भाजपला सत्ता गमवावी लागली. २०१८ साली झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक म्हणजे १०४ जागा मिळविल्या.

Karnataka Assembly Election 2023
Bazar Samiti Election : 'शेतकऱ्यांसाठी विरोधात लढलो, पण 'या' चार आमदारांमुळं माझा पराभव झाला'

वयाचा मुद्दा येडीयुराप्पांच्या मुळावर उठला

बहुमतासाठी नऊ आमदारांचे पाठबळ हवे होते. त्याची जुळणी न करताच येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची घाई केली. पण बहुमत सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर कुमारस्वामी पुन्हा मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री होण्याची इच्छा येडियुराप्पा यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे पुन्हा ऑपरेशन कमळ राबविले गेले व येडियुराप्पा पुन्हा मुख्यमंत्री झाले. पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे २०२३ पर्यंत येडियुराप्पा हेच मुख्यमंत्री राहतील, अशी अपेक्षा होती. पण वयाचा मुद्दा येडीयुराप्पा यांच्या मुळावर उठला.

Karnataka Assembly Election 2023
Karnataka Election : 'बजरंगबली की जय'च्या घोषणेनं मोदींची भाषणाला सुरुवात; म्हणाले, 'यांच्या'पासून सावध राहा

नऊ वर्षाच्या सत्ता काळात पाचवेळा बदलले मुख्यमंत्री

शिवाय, येडियुराप्पा यांचे सुपुत्र बी. वाय. विजयेंद्र यांचा कामकाजातील हस्तक्षेप वाढल्याच्या तक्रारी पक्षाच्या नेतृत्वाकडे दाखल झाल्या. त्यामुळे पुन्हा येडियुराप्पा यांच्यावर दबाव आणून नेतृत्वाने त्यांच्याकडून राजीनामा घेतला. त्यानंतर बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात भाजपला राज्यात चार वर्षेच सत्ता मिळाली, पण त्यातही पक्षाने दोन मुख्यमंत्री दिले. राज्यात भाजपने सुशासन दिले की नाही, या वेगळा व चर्चेचा विषय आहे. पण नऊ वर्षाच्या सत्ता काळात पाचवेळा मुख्यमंत्री बदलले हे विशेष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.