Karnatka Election 2023: कर्नाटकात काँग्रेसची हवा? सी व्होटरचा सर्व्हे काय सांगतो वाचा

भाजपनं इथं आपली सत्ता राखण्यासाठी चांगलाच जोर लावला आहे.
narendra modi and rahul gandhi
narendra modi and rahul gandhi
Updated on

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरु आहे. भाजपनं इथं आपली सत्ता राखण्यासाठी चांगलाच जोर लावला आहे. पण दक्षिणेतील भाजपची सत्ता असलेल्या या एकमेव राज्यात काँग्रेस जोरदार टक्कर देणार असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. (Karnataka Assembly Election 2023 C Voter survey says Congress will be in Power)

narendra modi and rahul gandhi
Mumbai High Court: "भटक्या कुत्र्यांना पिण्यासाठी पाणी द्या"; हायकोर्टाचे सोसायट्यांना निर्देश

टीव्ही ९ कन्नड आणि सी व्होटरच्या सर्वेनुसार, कर्नाटकात भाजपला धोबीपछाड देत काँग्रेस सत्तेत येईल असा कल आहे. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण २२४ जागा असून बहुमतासाठी ११३ जागांची गरज आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला १११ जागा मिळतील असं या सर्वेतून दिसून आलं आहे. तर भाजपला ८४ जागांवर समाधान मानावं लागेल. तर जनता दल सेक्युलरला (जेडीएस) २९ जागा मिळतील असा अंदाज आहे.

narendra modi and rahul gandhi
Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर..." ; सत्तासंघर्षावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया!

२०१८मधील बलाबलानुसार, काँग्रेसला २०२३ मध्ये ३१ जागा अधिक मिळतील, भाजपच्या २० जागा कमी होतील. तसेच जेडीएसला देखील फटका बसून त्यांच्या ८ जागा कमी होतील, असा अंदाज आहे. विशेषतः राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा फायदा कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसला होईल असं दिसून येतं आहे. या आकडेवारीनुसार, २ टक्के मतांनी भाजपच्या हातून सत्ता जाऊ शकते.

narendra modi and rahul gandhi
Suryakumar Yadav : मग सूर्याला टीममध्ये घेतलंच का... समालोचकानं थेटच विचारले

कारण २०१८च्या निवडणुकीत काँग्रेसला ३८ टक्के मतं होती ती २०२३ मध्ये ४० टक्क्यांवर पोहोचतील. तर भाजपला २०१८ मध्ये ३६ टक्के मतं होती त्यात २०२३ मध्ये आणखी घट होऊन ती ३३.९ टक्क्यांवर पोहोचतील, असं यातून दिसून येत आहे.

narendra modi and rahul gandhi
Crime News : गर्लफ्रेंडच्या वडिलांचा फोन चोरला अन् थेट मुख्यमंत्र्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली; कारण...

२०१८ मध्ये काँग्रेस आणि जेडीएसनं एकत्र येत सरकार स्थापन केलं होतं. कमी जागा असतानाही काँग्रेसनं एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री केलं होतं. पण दीड वर्षातच जेडीएसचे आमदार फुटले आणि भाजपला जाऊन मिळाले, त्यामुळं काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर भाजपनं सरकार स्थापन केलं. दक्षिण भारतातील भाजपचं सरकार असलेलं हे एकमेव राज्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.