Politics : कर्नाटक विधानसभेच्या जागांचं सध्याचं गणित काय, कोणाकडं किती आहेत जागा? जाणून घ्या

कर्नाटकमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत.
Karnataka Assembly Elections 2023
Karnataka Assembly Elections 2023esakal
Updated on

Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत, अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा राज्याकडं लागल्या आहेत. सध्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे.

मात्र, यावेळी भाजपची (BJP) थेट काँग्रेसशी लढत होणार आहे. राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेस पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पक्षाचे दोन दिग्गज नेते डीके शिवकुमार (DK Shivakumar) आणि सिद्धरामय्या हे गेल्या काही काळापासून भाजपवर सतत हल्लाबोल करत आहेत. राज्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांची ताकद वापरत आहेत. कर्नाटक हा दक्षिणेतील भाजपचा बालेकिल्लाही मानला जातो, त्यामुळं यावेळची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Karnataka Assembly Elections 2023
PM Modi News: PM मोदींचा फोटो फाडला म्हणून काँग्रेस आमदाराला ठोठावला 99 रुपयांचा दंड

राज्यातील सद्य स्थिती

राज्यात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत, त्यामुळं सत्तेत येण्यासाठी कोणत्याही पक्षाला 113 जागा जिंकणं आवश्यक आहे. सध्या राज्यात भाजपकडं 119 जागा आहेत, तर काँग्रेसकडं (Congress) 75 जागा आहेत. शिवाय, काँग्रेसचा माजी मित्रपक्ष जेडीएसकडं 28 जागा आहेत.

Karnataka Assembly Elections 2023
Kim Jong Un : सैनिकाकडून 653 गोळ्या गायब; हुकूमशहाचा संपूर्ण शहरात Lockdown चा आदेश

गेल्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीबद्दल बोलायचं झाल्यास भाजपला 46.43 टक्के मतं मिळाली होती, तर काँग्रेसला 35.71 मतं मिळाली होती. त्याचवेळी जेडीएसला 16.52 टक्के मतं मिळाली. त्यामुळं यावेळी काँग्रेस आणि भाजपच्या मतांच्या टक्केवारीतील तफावत निश्चितच सर्वांच्या नजरेसमोर असेल.

Karnataka Assembly Elections 2023
Breaking News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार; आयोगाची आज पत्रकार परिषद

विधानसभा निवडणूक : 2018 चे निकाल

गेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर, 2018 मध्ये भाजपनं 104 जागा जिंकल्या होत्या, काँग्रेसनं 80 जागा जिंकल्या आणि जेडीएसनं 37 जागा जिंकल्या होत्या. कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं नाही. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसनं मिळून राज्यात सरकार स्थापन केलं. युतीमध्ये जेडीएस नेते कुमारस्वामी यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आलं. पण, हे सरकार अवघ्या 14 महिन्यांनी कोसळलं.

Karnataka Assembly Elections 2023
VIDEO : मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असणाऱ्या नेत्यानं रॅलीत उडवल्या 500 रुपयाच्या नोटा; गोळा करण्यासाठी धावाधाव

काँग्रेसच्या अनेक आमदारांनी राजीनामे दिले, त्यामुळं कुमारस्वामी सरकार पडलं. काँग्रेस-जेडीएस युतीचं सरकार पडल्यानंतर भाजपनं येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र, दोन वर्षांनी येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आणि बसवराज बोम्मई यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आलं.

पाच वर्षांत बदलले तीन मुख्यमंत्री

कर्नाटकात गेल्या पाच वर्षांत बरीच राजकीय उलथापालथ झालीये. राज्यात पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री झाले. पहिले कुमारस्वामी नंतर येडियुरप्पा आणि शेवटी बसवराज बोम्मई राज्याचे मुख्यमंत्री झाले. कुमारस्वामी यांनी 23 मे 2018 रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते 23 जुलै 2019 पर्यंत मुख्यमंत्री राहिले आणि त्यानंतर येडियुरप्पा यांनी 26 जुलै 2019 रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते 28 जुलै 2021 पर्यंत मुख्यमंत्री राहिले. अखेर, 28 जुलै 2021 रोजी बसवराज राज्याचे मुख्यमंत्री झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()