Karnataka Election : सहा राज्यांत मद्यविक्रीवर बंदी; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

राज्यांतील मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचा आदेशही बजावण्यात आला आहे.
Illegal Liquor
Illegal Liquoresakal
Updated on
Summary

विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात चेकपोस्ट सुरू करण्याची सूचना केली होती.

बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election 2023) पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्रीवर निर्बंध (Liquor) घालण्यात आले आहे. त्यामुळे वाईन शॉप, बार अँड रेस्टॉरंट, क्लब तसेच एपीएमसी येथील केएसबीसीएल गोदामही बंद ठेवण्यात आले आहे.

त्याचबरोबर जिल्ह्यासह कर्नाटक राज्याच्या सीमेपासून पाच किलोमीटर अंतरावरील इतर राज्यांतील मद्यविक्रीची दुकानेही बंद ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात चेकपोस्ट सुरू करण्याची सूचना केली होती. त्यामुळे अवैध मद्यतस्करी आणि पैशांची होणारी वाहतूक रोखण्यात पोलिसांना यश आले.

Illegal Liquor
Nana Patole : 'काश्मीर फाइल्‍सप्रमाणंच केरळ स्‍टोरी भाजपच्या मदतीला, धर्माच्या नावावर तोडायचा प्रयत्‍न'

विशेषकरून गोवा राज्यातून बेळगावला होणारी दारूची वाहतूक रोखण्यासाठी कणकुंबी तपासणी नाक्यावर सर्व प्रकारच्या वाहनांची रात्रंदिवस तपासणी करण्यात आली. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त करण्यात अधिकाऱ्यांना यश आले.

Illegal Liquor
Rajaram Sugar Factory : सतेज पाटलांच्या गटाचा 'कंडका' पाडत 'राजाराम'च्या अध्यक्षपदी अमल महाडिक

बुधवारी (ता. १०) विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर शनिवारी (ता. १३) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी नीतेश पाटील यांनी सोमवारी (ता. ८) सायंकाळी ५ पासून ते ११ मे रोजी सकाळपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकारची मध्यवर्ती दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. त्याचबरोबर १३ रोजी मतमोजणी होणार असल्याने शुक्रवार (ता. १२) पासून ते रविवारी (ता. १४) सकाळपर्यंत मद्यविक्री दुकाने बंद राहणार आहेत.

Illegal Liquor
Karnataka Election : राज्यावर अस्मानी संकट; मतदानावर परिणाम होण्याची शक्यता!

दरम्यान, कर्नाटक राज्याच्या हद्दीपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि गोवा राज्यांतील मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचा आदेशही बजावण्यात आला आहे. या काळात सीमावर्ती भागातील परराज्यात जाऊन मद्याची खरेदी केली जाऊ शकते. त्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()