Karnataka Election : कर्नाटकात Exit Poll काँग्रेसच्या बाजूनं; PM मोदी 6 दिवसांत घेणार तब्बल 15 सभा अन् रोड शो

पंतप्रधान मोदी 28 एप्रिल रोजी निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील आणि हा प्रचार 7 मे पर्यंत चालणार आहे.
Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Election 2023esakal
Updated on
Summary

यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारापूर्वी आठ वेळा कर्नाटकचा दौरा केला आहे.

Karnataka Assembly Election 2023 : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सहा दिवसांत सुमारे 15 जाहीर सभा आणि रोड शो करणार आहेत.

पंतप्रधान मोदी 28 एप्रिल रोजी निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील आणि हा प्रचार 7 मे पर्यंत चालणार आहे. कर्नाटकला भाजपचं दक्षिणेचं प्रवेशद्वार म्हटलं जात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह प्रमुख नेते निवडणूक प्रचारात उतरले आहेत.

Karnataka Assembly Election 2023
Karnataka Election : भाजपला एकाही मुस्लिम मताची गरज नाही; मोदींनी फोन केलेल्या नेत्याचं वादग्रस्त विधान

लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी

मोदींच्या सभेसासाठी भारतीय जनता पक्ष उत्साही आहे. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलंय की, "कर्नाटक निवडणुकांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानली जात आहे. त्यामुळंच भाजप इतर राज्यांपेक्षा कर्नाटकवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे."

Karnataka Assembly Election 2023
Karnataka Election : रात्रंदिवस मेहनत करायला लागली तरी चालेल, पण शेट्टरांना..; येडियुरप्पांचं थेट चॅलेंज

पंतप्रधान कोणत्या तारखेला प्रचार करणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 एप्रिल रोजी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यानंतर ते 29 एप्रिल, 3 मे, 4 मे, 6 मे आणि 7 मे रोजी प्रचार करतील.

बेळगावमधून प्रचाराला सुरुवात

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आपल्या प्रचाराची सुरुवात बेळगावमधून करणार आहेत. कर्नाटकातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बेळगावातील चिक्कोडी, कित्तूर आणि कुडाचीला ते भेट देणार आहेत. याशिवाय, पंतप्रधान उत्तर कन्नड जिल्ह्यालाही भेट देणार आहेत. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Karnataka Assembly Election 2023
Karnataka Election : राष्ट्रवादीचं 'घड्याळ' आधीच बंद पडलंय; जाहीर सभेत स्मृती इराणींचा शरद पवारांना टोला

पंतप्रधानांची वर्षात 8 वेळा कर्नाटकला भेट

यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारापूर्वी आठ वेळा कर्नाटकचा दौरा केला आहे. 9 एप्रिल रोजी त्यांनी इथं शेवटची भेट दिली होती. त्याआधी, भाजपच्या राज्यव्यापी 'विजय संकल्प यात्रे'च्या समारोपाच्या निमित्तानं ते 25 मार्च रोजी कर्नाटकातील दावणगिरी इथं पोहोचले होते आणि रोड शोनंतर जाहीर सभेला संबोधित केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()