Karnataka Election : भाजपचे 'हे' नेते डीके शिवकुमार, सिद्धरामय्यांना थेट भिडणार; कोणाला मिळालं कुठून तिकीट?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या महिनाभरापूर्वीच सत्ताधारी पक्षानं निवडणूक उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
Karnataka Election
Karnataka Electionesakal
Updated on
Summary

ही निवडणूक भाजपसाठी कठीण मानली जात आहे. कारण, या निवडणुकीत भाजपची थेट काँग्रेसशी लढत आहे.

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या महिनाभरापूर्वीच सत्ताधारी पक्षानं निवडणूक उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

दिल्लीत भाजप हायकमांडनं (BJP High Command) विचारमंथन केल्यानंतर 189 उमेदवारांची ही यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 53 नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे.

यावेळी कर्नाटक निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाईल आणि कलंकित नेत्यांना बाजूला केलं जाईल, असं पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र, भाजपचा हा प्रयोग कितपत यशस्वी होईल हे 13 मे रोजी स्पष्ट होणार आहे.

Karnataka Election
Sonia Gandhi : बळजबरीनं गप्प बसून देशाचे प्रश्न सुटणार नाहीत; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

ही निवडणूक भाजपसाठी कठीण मानली जात आहे. कारण, या निवडणुकीत भाजपची थेट काँग्रेसशी लढत आहे. आता अशा परिस्थितीत काँग्रेसचे दिग्गज नेते सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांना टक्कर देण्यासाठी सत्ताधारी पक्षानं कोणाला मैदानात उतरवलं आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊ..

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार कनकपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. डीकेंना टक्कर देण्यासाठी भाजपनं आर. अशोक यांना मैदानात उतरवलंय. आर अशोक भाजपच्या तिकीटावर पद्मनाभनगर आणि कनकपुरा या दोन जागांवरून निवडणूक लढवत आहेत.

Karnataka Election
Sachin Pilot: नाव भाजपचं पण खरं लक्ष्य काँग्रेस, सचिन पायलटांच्या उपोषणामागं काय घडतंय?

दुसरीकडं, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) त्यांच्या मूळ वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. भाजपनं त्यांच्याविरोधात व्ही सोमन्ना यांना वरुणा मतदारसंघातून उमेदवारी दिलीये. भाजपनं सोमण्णा यांनाही दोन जागांवर तिकीट दिलंय. सोमन्ना चामराजनगरमधूनही निवडणूक लढवणार आहेत.

Karnataka Election
Karnataka Election

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या मुलाला वरुणा मतदारसंघातून सिद्धरामय्या यांच्या विरोधात रिंगणात उतरवणार असल्याच्या बातम्या होत्या. पण, येडियुरप्पांनी याला विरोध केला. त्यामुळं भाजपनं त्यांची मागणी मान्य करत विजयेंद्र यांना शिकारपुरामधून तिकीट देऊन रिंगणात उतरवलंय.

Karnataka Election
Luizinho Faleiro : ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा धक्का; 'या' खासदारानं दिला पक्षाचा राजीनामा

बोम्मईंसह दिग्गज नेते कोठून निवडणूक लढवत आहेत, ते जाणून घ्या..

  • कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) हे शिग्गावमधून निवडणूक लढवणार आहेत.

  • मंत्री बी श्रीरामुलू हे बेल्लारी ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

  • भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी पारंपरिक चिक्कमंगळूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

  • आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर हे चिक्कबल्लापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

  • कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र तिर्थहल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.